छत्तीसगड राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघास दोन सुवर्णपदक तर रौप्यपदक, कांस्यपदक विजेता

परभणी (।              ) टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया मान्यतेने छत्तीसगड टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने २७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा भाटापारा येथे दि. २६ ते २८ जून दरम्यान संपन्न झाल्या यात महाराष्ट्र राज्य संघाने सबज्युनिअर मुले व मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदक तर ज्युनिअर मिश्र दुहेरी गटात रौप्यपदक व मुले गटात कांस्यपदक पटकावले. 

सब ज्युनिअर मुले गटात अंतिम सामना  महाराष्ट्र वि. गुजरात दरम्यान 2:0 सेट मध्ये महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक प्राप्त केले. 

सब ज्युनिअर मिश्र दुहेरी गटात अंतिम सामना 

महाराष्ट्र vs कर्नाटक 

2:0  सेट मध्ये महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले.

जूनियर मिश्र दुहेरी गटात अंतिम सामना महाराष्ट्र वि दिल्ली 0:2  सेट मध्ये दिल्ली विजयी ठरला , महाराष्ट्र संघास रौप्यपदक विजेता ठरला ‌

: जूनियर मुले गटात  तृतीय क्रमांक साठी महाराष्ट्र वि  केरला दरम्यान 2:0  महाराष्ट्र संघाने विजयी ठरला.

सब-ज्युनिअर मुले सुवर्णपदक गटात :ईश्वर मोरे ,दिव्यांशु चांद , वेदांत महामाने , गौरव चौधरी , मयूर निकम ,विर पाटील यांचा समावेश होता.

 सब- ज्युनिअर मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदक विजेता 

राजवीर भोसले व सोनाक्षी कदम.

ज्युनिअर मिश्र दुहेरी रौप्यपदक:शिवम कदम व श्रेया धावन

 ज्युनिअर मुले गटात कांस्यपदक विजेता संघातह कृष्णा अहिरे ,विवेक साळुंखे ,प्रसाद महाले ,मयूर बोरसे ,प्रताप पौळ , अनंत धापसे

महाराष्ट्र राज्य संघास प्रशिक्षक म्हणून निलेश माळवे, उज्वला कदम, गणेश आम्ले, शिवदास खुपसे यांनी काम पाहिले.

या उज्वल यशा बदल डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार, कार्याध्यक्ष डॉ.आबासाहेब सिरसाठ, उपाध्यक्ष आनंद खरे,रामेश्वर कोरडे, किशोर चौधरी, कोषाध्यक्ष डॉ.दिनेश शिगारम, विभागीय सचिव अशोक शिंदे, वैभव शिंदे आशिष ओबेरॉय, यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या