पंढरपूरला सानपाडा येथील ५५० भाविकांचे विनाशुल्क पांडुरंग दर्शन*





 नवी मुंबई: सानपाडा विभागातील  नगरसेवक सोमनाथ वास्कर  आणि सौ.कोमल सोमनाथ वास्कर यांनी ४ आणि  ५  जुलै २०२५ रोजी सानपाडा येथील  भाविकांस पांडुरंगाच्या दर्शनास नेण्याचा  संकल्प  केला होता. त्यानुसार  सुमारे ५ ५० भाविकांनी  पांडुरंगाचे दर्शन घेतले.

 भाविकांची संख्या निश्चित झाल्यानंतर गायत्री ट्रान्सपोर्टचे  अजिंक्य शिवणकर  यांनी १० बस भाड़ेतत्वावर उपलब्ध करुन दिल्या. आपल्या सोबत असलेल्या भाविकांची अंघोळ व चहापान व्यवस्था व्हावी याकरिता नितिनशेठ मगर यांनी  एका दिवसात ३ मंगलकार्यालय भाविकांच्या सेवेसाठी मिळवुन दिले. आणि चहाची  व्यवस्था केली .  भाविकांना बसमध्ये फराळी चिवड़ा आणि पाणी  व्यवस्था नगरसेविका सौ.कोमल वास्कर, राजगिरा लाडु  दत्ता ठाकुर व मिलिंद मनवर यांच्या वतीने करण्यात आली.  यात्रा बसमध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे   प्रत्येकास ओळखपत्र  द्यावे, याकरिता यश कूटे यांनी सुंदर ओळखपत्र तयार करून घेतले.  या ओळखपत्रामुळेच अनेक ज्येष्ठ भाविकांसाठी पोलिसांनी  स्वयंसेवाकांशी संपर्क साधला.  शिवसेना शाखेवर विश्वास ठेवुन सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकास सुखरुप पणे घरी घेवुन आणन्यासाठी  श्री दत्त मित्र मंडळाचे सर्व सदस्यांनी खुप मेहनत घेतली . तसेच त्यांनी  परतीच्या रात्री प्रवासात एक बस शिरवळ  फाटा येथे बंद पड़ली असे समजल्यावर स्वता खाली उतरून एसटीने परतीचा प्रवास केला.  बंद पडलेल्या बस मधील प्रवाशांना सुखरूप सानपाडा येथील घरी पोहचविले. त्यांचे ही विशेष कौतुक.  मंदिर ते पार्किंग हा खुप मोठा अंतर आहे.  लाखोंच्या गर्दीत अनेक  ज्येष्ठ भाविक हरवले होते. त्यांना शोधुन बसमध्ये आणने मोठे आव्हान होते,  तरी ते कार्य यशस्वी पुर्ण करणारे  रणधीर सुर्वे आणि  दत्त मित्र  मंडळाचे सर्व सदस्य , यात्रा नोंदणी जबाबदारीने पार  पाडणारे प्रल्हाद गायकवाड व मुख्यत: या सहलीत  सानपाडा विभागातील सर्व  भाविक विश्वासाने सहभागी झाले त्याबद्दल  नगरसेविका कोमल वास्कर यांनी सर्वांचेच मनापासुन आभार मानले. 

 पांडुरंगाच्या आशिर्वादाने  पंढरीची वारी रूपी सेवा आम्हास करता आली. ही सर्व सेवा पांडुरंगा चरणी अर्पण करतो असे नगरसेवक सोमनाथ वास्कर आणि कोमल वास्कर यांनी सांगितले.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या
Popular posts
उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकर व मुलींची वडिलांकडून हत्या
इमेज
सेलू तालुका बुद्धीबळ, योगासन,कॅरम क्रीडा स्पर्धा प्रारंभ
इमेज
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या विजयी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा*
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज
डाॅ.लोपामुद्रा,आपण महाराष्ट्र पोलीस दलाचीच नव्हे तर भारतीय पोलीस दलाची "डाॅ.विजश्री लोपामुद्रा" आहात!...डाॅ.हंसराज वैद्य...*
इमेज