परभणी: प्रतीक तुलसानी पहिली महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा स्पर्धा दि. ६ ते १० जुलै दरम्यान ऐरोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऐरोली येथे ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत 11 व 13 वर्ष मुले मुलींच्या गटांमध्ये पहिल्या दोन दिवसात खूप अतितटीचे सामने झाले. या स्पर्धेत अकरा वर्ष मुलींच्या गटांमध्ये परभणीच्या आद्या महेश बाहेती हिने सुवर्णपदक पटकावला तर आहाना गोडबोले (पुणे ) हिने रौप्यपदक, श्रीनिका उमेकर व इरीना अहमद (पुणे)या खेळाडूंनी कांस्यपदक पटकावला.
तेरा वर्षांची मुलींच्या गटात केशीका पूरकर(नाशिक) हिने प्रथम पटकावला ,फलक झंवर (सब मुंबई) रौप्यपदक पटकावला .रीतन्या देवळेकर व गीत जगताप (कोल्हापूर) यांनी कांस्यपदक पटकावले
मुलांच्या गटात अकरा वर्षे मुले गटात आदिराज चव्हाण (ठाणे)याने सुवर्णपदक तसेच वरदान कोलते (पुणे)यांनी रौप्यपदक तर राजवर्धन तिवारी (सोलापूर ) कांस्यपदक पटकावला.
तेरा वर्षे मुलांच्या गटात आहात याने सुवर्ण तर पुण्याच्या नीलम मुळे याने रौप्य पदक पटका
यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा राज्य अध्यक्ष प्रविण लुकंड, राज्य सरचिटणीस यतिन टिपण्णीस, राज्य कोषाध्यक्ष संजय कडू, कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, टे.टे.प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांनी शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा