गुजरात: जगामध्ये २६ जून २०२५ पासून कामगारांच्या हक्कासाठी अंमलात आलेल्या हाँगकाँग कन्व्हेन्शन अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर, २९ जून २०२५ रोजी गुजरात मधील अलंग येथे अलंग शिपब्रेकिंग सोशिया रिसायकलिंग वर्कर्स असोसिएशनच्या पुढाकाराने जहाज तोडणी कामगारांची त्रिपक्षीय परिषद आणि कामगार मेळावा संपन्न झाला. या ऐतिहासिक कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, डी. जी. शिपिंग, गुजरात मेरीटाईम बोर्ड, शिप रिसायकलिंग एम्प्लॉयर्स असोसिएशन. आणि इंडस्ट्रीऑल ग्लोबल युनियन यांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था सहभागी झाल्या होत्या. या परिषदेमध्ये हाँगकाँग कन्व्हेंशन अंमलबजावणीतील व्यावहारिक अडचणी, संधी आणि कामगारांवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या भारतीय संचालक मिचिको मियामोटो यांनी सामाजिक संवाद आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीचे महत्त्व सांगितले, तर डी. जी. शिपिंगचे महासंचालक श्याम जगन्नाथन यांनी भारताच्या नेतृत्वाचे कौतुक करत कामगार-केंद्रित विकासावर भर दिला. डी.जी. शिपिंगचे अतिरिक्त महासंचालक अजित सुकुमारन यांनी हाँगकाँग कन्व्हेंशनचे तांत्रिक पैलू स्पष्ट केले, तर गुजरात मेरीटाईम बोर्डचे मुख्य अभियंता तलाविया यांनी अलंगमधील सुविधा आणि नियोजन मांडले. शिप सायकलिंग एम्प्लॉयर्स असोसिएशनचे सचिव हरेश परमार यांनी उद्योग क्षेत्राच्या अडचणी आणि संतुलित नियमनाची गरज व्यक्त केली.
इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियनचे सहाय्यक महासचिव कान मात्सुझाकी यांनी न्याय्य संक्रमणावर भर दिला, तर संचालक वॉल्टन पँटलँड यांनी सुरक्षा समित्या, सामूहिक करार आणि डाउनस्ट्रीम कामगारांचे मुद्दे मांडले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या भारतीय समन्वयक डॉ. पल्लवी मानसिंग यांनी कामगारांचे वास्तव अधोरेखित केले. अलंग शिपब्रेकिंग सोशिया रिसायकलिंग जनरल वर्कर्स असोसिएशनचे सरचिटणीस विद्याधर राणे यांनी कामगारांना लाभार्थी नव्हे तर भागीदार म्हणून समाविष्ट करण्याचे आवाहन केले. कामगार परिषदेनंतर झालेल्या मेळाव्यामध्ये ३५० कामगारांनी, विशेषतः महिलांनी, उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मेळाव्यामध्ये डी. जी. शिपिंगचे श्याम जगन्नाथन, मियामोटो, विद्याधर राणे, मात्सुझाकी, पँटलँड, डॉ. मानसिंग, मिलिंद कांदळगावकर, कॅप्टन तुषार प्रधान व संतोष कुमार दोरोकर यांनी कामगारांचे हक्क, सुरक्षितता व सन्मानित उपजीविकेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. सामाजिक संवाद, महिला सहभाग, आरोग्य व सुरक्षा व्यवस्था, आणि न्याय्य संक्रमण यांचे तत्त्व केवळ बोलण्यापुरते नसून प्रत्यक्ष कृतीत उतरवले गेले पाहिजे. आम्ही सरकार, उद्योग आणि जागतिक संघटनांसोबत हाँगकाँग कन्व्हेंशनचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सज्ज आहोत, पण कामगारांचा आवाज केंद्रस्थानी असेल, तरच ही प्रक्रिया यशस्वी होईल. सुरक्षित, स्वच्छ आणि मानवी हक्कधारित अलंग” या दिशेने एकत्र वाटचाल करण्याचे वचन देऊन,अलंगमधून उभा राहणारा हा कामगार एकजुटीचा आवाज जागतिक स्तरावर सामाजिकदृष्ट्या जबाबदार व नैतिक पुनर्वापरासाठी एक नवा बेंचमार्क सिद्ध होईल, असे संघटनेचे खजिनदार विकास नलावडे यांनी सांगून सर्वांचे आभार मानले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा