मुंबई दिनांक ४: गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या १४ कामगार संघटनांच्या, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने,आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने ९ जुलै रोजी आयोजिलेल्या "लॉन्ग मार्च"ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पाठिंबा दिला आहे .
शिवाजी पार्क येथील, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी त्यांची गिरणी कामगार संयुक्त कृती लढा समितीच्या नेत्यांद्वारे आज भेट घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी गिरणी कामगारांच्या लढ्याला वरील प्रमाणे पाठिंबा दिला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची २७ जून रोजी कामगार संघटना संयुक्त कृती लढा समितीने मातोश्रीवर भेट घेतली होती. तेव्हा त्यांनीही गिरणी कामगारांच्या "लॉंग मार्च"ला आपला पाठिंबा दिला होता.
आजच्या बैठकी प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी गृहनिर्माण राज्यमंत्री बाळा नांदगावकर उपस्थित होते.लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांनी घराच्या प्रश्नावर सरकारद्वारे कामगा रांची कशी फसवणूक होत आहे आणि हा प्रश्न अकारण लांबवीला जात आहे, याची माहिती दिली, याप्रसंगी कॉम्रेड विजय कुलकर्णी, बाळ खवणेकर, रमाकांत बने,आनंद मोरे,संतोष सावंत, निवृत्ती देसाई, सुनील बोरकर, राजेंद्र साळसकर आदि कामगार नेते यावेळी उपस्थित होते.
गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर समितीचे प्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात आवाज उठविण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करीत आहेत.
दोनच दिवसांपूर्वी माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते ऍड.अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष (शरद पवार गट ) आमदार शशिकांत शिंदे आदी मान्यवरांची सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीने भेट घेऊन, या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.या व्यतिरिक्त विविध पक्षांच्या आमदारांना लेखी निवेदन देऊन "लॉंग मार्च"मध्ये सहभागी होण्याचे कृती लढा समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. तेव्हा गिरणी कामगारांच्या "लॉन्ग मार्च" द्वारे कामगारांच्या विराट शक्तीचे प्रदर्शन घडेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा