*गंगाखेड (प्रतिनिधी).* दिनांक एक जुलै रोजी शहरातील समर्थ फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी तर्फे विविध उपक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम हरितक्रांतीचे प्रणेते तथा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच डॉक्टर डे, चार्टर्ड अकाउंटंट डे व फार्मर डे निमित्त शहरातील नामांकित तज्ञ डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट व प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. किशन गारोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मल्लूरवार, डॉ धनंजय देशमुख, डॉ. महेश शिंदे ,डॉ. रीतेश वट्टमवार तसेच प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब यादव, अनंत काळे, नागेश केरकर, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर गुंडाळे यांचा तर चार्टर्ड अकाउंटंट मध्ये टॅक्स कन्सल्टंट गोविंद भंडारी, पुरुषोत्तम भंडारी, प्रसाद फरकंडकर आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी अतुल गंजेवार, गोविंद रोडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय धारे, सचिव गोपाळ मंत्री कोषाध्यक्ष नानासाहेब पाटील, अंबादास राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ मंत्री यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश तोतला, मकरंद चिनके, मेहमूद शेख, अनिल यानपल्लेवार, अभिनय नळदकर, अतुल तुपकर, मंगेश आंधळे, अमोल पेचफुले, प्रदीप गुंडाळे, राहुल अय्या, माधव चव्हाण, अंबादास चव्हाण, विनय नालटे, निखिल गुंडाळे, सदानंद पेकम, प्रा सुभाष भारती, राजू लांडगे आदींनी सहकार्य केले.
लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी तर्फे विविध उपक्रम*
addComments
टिप्पणी पोस्ट करा