राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, सभापती मंचकराव पाटील यांच्या पुढाकाराने अहमदपुरात उभारणार शेतकरी भवन :*

  2 कोटी 90लक्ष 49 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता*.... अहमदपूर - राज्याचे सहकार मंत्री तथा चाकूर - अहमदपूर विधानसभा मतदारसंघ...

 

2 कोटी 90लक्ष 49 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता*....
अहमदपूर - राज्याचे सहकार मंत्री तथा चाकूर - अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ना. बाबासाहेब पाटील यांना अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांनी अहमदपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतकरी भवन मंजूर करून द्यावे अशी आग्रही मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी राज्याचे पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्याशी अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील व सर्व संचालक मंडळांनी त्यांची भेट घेत अहमदपूर येथे शेतकरी भवन मंजूर करावे अशी आग्रही मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आज राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी भावनांसाठी 02 कोटी 90 लक्ष 49 हजार रुपयाची प्रशासकीय मान्यता प्रदान केली असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिली आहे.  
 याबाबत सविस्तर माहिती अशी की नामदार बाबासाहेब पाटील, सभापती मंचकराव पाटील एक स्वतः शेतकरी असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या व्यथा व वेदना त्यांना माहित आहेत. तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी विविध कामानिमित्त येतात, कृषी उत्पन्न बाजार समितीत सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी येत असतात. त्यांना या ठिकाणी थांबण्यासाठी कुठलीही एक महत्त्वाचे ठिकाण नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या गोष्टीची दखल घेत सभापती मंचकराव पाटील व संचालक मंडळांनी राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्याकडे शेतकरी भावनांची आग्रही मागणी केली होती. नामदार पाटील यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सभापती मंचकराव पाटील व सर्व संचालक मंडळाची बैठक घेऊन अहमदपूरला शेतकरी भवन तात्काळ मंजूर करावे अशी आग्रही मागणी केली. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने येथे नव्याने कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर येथे शेतकरी भवन बांधण्यासाठी 2 कोटी 90लक्ष 49 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली असून सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून लवकरच या शेतकरी भवनाचे काम सुरू होईल अशी माहिती राज्याची सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंचकराव पाटील यांनी दिली आहे. या शेतकरी भवनामुळे अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आधार मिळणार आहे. त्यामुळे अहमदपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आनंदी आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी नामदार बाबासाहेब पाटील, सभापती मंचकराव पाटील यांचे शेतकरी भवन च्या उभारणी बद्दल आभार मानले आहेत.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel