पत्रकारिता एक अफाट असा क्षेत्र आहे. ग्रामीण भागात राहून सुद्धा मी नांदेड शहरातील पत्रकारिता क्षेत्रात वावरत असतो. यामुळे माझा परिचय अनेक व्यक्तींशी होत असते. त्यात एका व्यक्तिमत्वाविषयी माझ्या मनात नेहमीच कुतूहल असते. ते व्यक्तिमत्व आहे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता आणी साहित्यिक असलेले स. रविंद्रसिंघ मोदी. अति मनमिळाऊ, संयमी आणी अभ्यासु असलेले रविंद्रसिंघ मोदी यांच्याशी माझे पारिवारिक नाते केव्हा जुळले कळलंच नाही. पण जवळपास वीस वर्षांपासून मी त्यांना ओळखतो आहे. नांदेड मध्ये राहून त्यांनी मराठी, हिंदी, पंजाबी आणी तेलगु वर्तमान पत्रात बातम्या व लेख लिहिण्याचे मोठे योगदान दिलेले आहे. बहुभाषी पत्रकारिता करणारे असले व्यक्तिमत्व मराठावाडा परिसरात एखादेच असणार.
रविंद्रसिंघ मोदी बाबत विशेष करुन वर्ष 2008 साली नांदेड येथे पार पडलेल्या गुरुतागद्दी सोहळ्याच्या वेळी त्यांनी निःस्वार्थ आणी जागरूक पत्रकारिता कशी असते त्याचे एक उदाहरण प्रस्थापित केलं होतं. त्यांच्या लिखाणातील धार आणी प्रखरता आज देखील जाणवत असते. ते शीख समाजातील एक प्रखर वक्ता म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. शहरातील अनेक विषय आणी शीख समाजातील प्रश्नना विषयी त्यांची तळमळ असते. पण एकच खंत मांडाविशी वाटते की, पत्रकारिता क्षेत्र आणी शीख समाजात त्यांच्या पदरात उपेक्षाच जास्त पडली आहे. त्यांनी स्वतंत्र वार्ता, लोकमत समाचार, दैनिक भास्कर, दैनिक सकाळ, दैनिक अजीत, दैनिक प्रतिदिन अख़बार सारख्या मोठ्या वर्तमान पत्रासाठी पत्रकारिता केली आहे. सोबतच स्थानीक वर्तमान पत्रात त्यांचे लेख आणी बातम्या नियमितपणे प्रकाशित होत असतात. शीख समाजाच्या प्रश्नावर त्यांचे लेख अभ्यासु आणी आक्रमक असे असतात. तर शीख धर्माच्या विविध धार्मिक सणाविषयी त्यांचे लेख व बातम्या अभ्यासपूर्ण असतात. जवळपास तीस वर्षाच्या पत्रकारितेत त्यांनी आपली एक स्वच्छ प्रतिमा निर्माण केली आहे. गुरुद्वारा बोर्ड कायदा (कलम आकरा) संशोधन विषयीचे आंदोलन खऱ्या अर्थाने त्यांनीच सुरु केलेले आहे. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी शासनाला वारंवार प्रश्नं उपस्थित केलेला आहे. मोठमोठ्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्याची त्यांची आक्रमक शैली राजकीय वर्त्तळात नेहमी चर्चेचा विषय ठरते. माजी केंद्रीय गृहमंत्री बूटासिंघ, योजना आयोगाचे माजी उपाध्यक्ष मोंटेकसिंघ अहलुवालिया, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंघ बादल, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, लालकृष्ण आडवाणी, माजी पंतप्रधान पी. वी. नरसिम्हा राव सारख्या असंख्य नेत्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी अभ्यासपूर्ण प्रश्नं उपस्थित केले होते. त्यांना ओळखणारी जिल्ह्यात अनेक नेते मंडळी आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री आणी माजी खासदार भास्करराव पाटिल खतगावकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटिल, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, खासदार डॉ अजीत गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, माजी खासदार व आमदार हेमंत भाऊ पाटिल, माजी खासदार डॉ वेंकटेश काबदे, आमदार बालाजीराव कल्याणकर, नूतन आमदार आनंदराव तिडके पाटिल बोंढारकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे व अनेक नेते त्यांना एक जिज्ञासु पत्रकार म्हणून ओळखतात. शीख समाजाच्या प्रश्नना विषयी किंवा नांदेड शहराच्या विकासा बद्दल त्यांच्या भावना प्रबल आहेत. गुरुद्वारात साजरा होणाऱ्या तखतस्नान सणाविषयी त्यांनी सकारात्मक लिखाण करून त्याचे महत्व जगापुढे मांडले. या सणा विषयी दहा - वीस वर्षापूर्वी खूप कमी लोकांना माहिती होती. त्यांनी गोदावरी शुद्धिकरण आंदोलन सुरु करुन तखतस्नान कार्यक्रमाचा त्यास संबंध जोडला. लेख लिहून आणी पत्रकारांना माहिती देऊन या सणाला झळाळी मिळावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या अंगी अफाट नेतृत्व क्षमता असून ही ते राजकरणा पासून अलिप्त राहतात आणी गुरुद्वारा किंवा शीख समाजाच्या सेवेसाठी आपला वेळ खर्च करतात. सर्व धर्मा विषयी त्यांना जिव्हाळा असतो. श्री दत्त जयंती विषयी ते विशेष लेख लिहितात. श्री गणेशोत्सव सणात त्यांचे योगदान असते. उच्च शिक्षित, प्रभावी वक्ता आणी समाजसेवक असलेले स. रविंद्रसिंघ मोदी यांना त्यांचे वाढदिवस (दि. 15 जुले) निमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा.
लेखक : आनंदा बोकारे, पत्रकार, नांदेड.
....
addComments
टिप्पणी पोस्ट करा