मुंबई: माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे विजय सोमा सावंत यांच्या वेदांत क्रियेशन्स तसेच, सुजाता खरे यांच्या सुजाता म्युझिकल्स आणि सुरेश भोसले यांच्या श्री गणेश प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जून २०२५ रोजी अमित कुमार लाइव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम संपन्न झाला. अनघा इव्हेंट या कार्यक्रमाचे पी आर पार्टनर होते तर, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि न्यू इंडिया अश्युरन्स या संगीत मैफलीचे प्रायोजक होते.
अमित कुमार यांनी तेरी कसम, बालिका वधू, तेजाब, कभी हा कभी ना इत्यादी हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गाणी सादर करून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. त्यांनी गाणी गाण्यापूर्वी चित्रपटा मधील गाण्यांच्या रेकॉर्डिंग होण्याच्या वेळच्या काही मजेदार आठवणीही सांगितल्या. गाणी बघताना व ऐकताना जणू काही स्वर्गवासी किशोर कुमार गात आहेत असा अनुभव प्रेक्षकांना आला. संगीत प्रेमींचा तुडुंब प्रतिसाद लाभलेल्या या हाउसफुल्ल शोमुळे एक वेगळेच असे चैतन्य निर्माण झाले. हा शो पहाण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी सेक्रेटरी आर. पी. पैबीर, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, मुंबई पोर्टचे उप लेखाधिकारी कनोजिया , मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे , पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, प्रसिद्ध वास्तुविशारद संदीप प्रभू, नवी मुंबई सानपाडा शिवसेना ( उबाठा )विभागप्रमुख अजय पवार तसेच समाजातील इतर मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा