प्रो कबड्डी लीग पर्व १२ : महाराष्ट्रातील खेळाडूंची घसरण, यंदा केवळ ३२ खेळाडूंना मिळाली संधी!!!

मुंबई/६ जून/ (क्रीडा प्रतिनिधी)

प्रो कबड्डी लीग (PKL) पर्व १२ साठी नुकत्याच पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात महाराष्ट्रातील एकूण ३२ खेळाडूंना संघांमध्ये स्थान मिळाले आहे. मागील हंगामात ही संख्या ४३ होती, त्यामुळे यंदा ११ खेळाडूंची घट झाली आहे.

ही घट महाराष्ट्रातील कबड्डीच्या वाढत्या स्पर्धात्मकतेसाठी चिंतेची बाब असली, तरी काही संघांनी स्थानिक खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांना संधी दिली आहे.

📊 संघनिहाय महाराष्ट्रातील खेळाडूंची संख्या..

१. पुणेरी पलटन (Puneri Paltan)

असलम इनामदार,पंकज मोहिते,आदित्य शिंदे,दादासाहेब पुजारी,अभिषेक गुंगे,वैभव राबाडे,रोहन तुपारे.

२. बेंगळुरू बुल्स (Bengaluru Bulls)

 आकाश शिंदे,शुभम बिटके,शुभम रहाटे,साहिल राणे.

३. तमिळ थलाइवाज (Tamil Thalaivas)

अनुज गावडे,धीरज बैलमारे,अमिराज पवार,सुरेश जाधव.

४. तेलगू टायटन्स (Telugu Titans)

 शुभम शिंदे,अजित पवार,शंकर गदाई,प्रफुल्ल झावरे.

५ . पाटणा पायरेट्स ( Patna Pirates)

संकेत सावंत,बालाजी जाधव,साहिल पाटील.

६ . हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers)

शिवम पटारे ,विशाल नाटे,विकास जाधव.

७.  दमंग दिल्ली (Dabang Delhi)

अजिंक्य पवार,अरकम शेख.

८.  यूपी योद्धास ( UP Yoddhas)

प्रणय राणे,जयेश महाजन.

९ . यू मुंबा ( U Mumba)

अजित चौहान

१० . बंगाल  वॉरियर्स (Bengal Warriors)

 मयूर कदम

११ . गुजरात जायंट (Gujarat Giants)

श्रीधर कदम

१२ . जयपूर पिंक पँथर्स (Jaipur Pink Panthers)

नाही 

संख्येतील घट आणि त्यामागची कारणे..

मागील हंगामात ४३ खेळाडू महाराष्ट्रातून सहभागी झाले होते. यंदा ही संख्या ११ ने घटून ३२ वर आली आहे. त्यामागची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:

१) इतर राज्यातील खेळाडूंचा चांगला फॉर्म

२) महाराष्ट्रातील काही प्रमुख खेळाडूंचा फॉर्म किंवा फिटनेसचा अभाव.

३) संघांचे नव्या चेहऱ्यांवर लक्ष केंद्रीत करणे.

टिप्पण्या