नवी मुंबई सानपाडा येथील ४०७ ज्येष्ठ नागरिक व तरुणांची गोवा येथे मोफत पिकनिक

नवी मुंबई सानपाडा येथील नागरिकांच्या  सुख दुःखात नेहमी संपर्कात असणारे आणि सर्वांना सतत मदत आणि  सहकार्य करणारे  शिवसेनेचे लोकप्रिय नगरसेवक ...



नवी मुंबई सानपाडा येथील नागरिकांच्या  सुख दुःखात नेहमी संपर्कात असणारे आणि सर्वांना सतत मदत आणि  सहकार्य करणारे  शिवसेनेचे लोकप्रिय नगरसेवक मा. श्री. सोमनाथ वासकर यांनी ६  ते ८  जूनच्या दरम्यान गोवा येथील कलंगुट बीच जवळील पाम रिसॉर्टवर ४२७ ज्येष्ठ नागरिक व तरुणांची मोफत पिकनिक आयोजित केली होती. या पिकनिकमध्ये एसी बसमधून   बालाजी मंदिर, मंगेशी टेम्पल, गोवा चर्च, डोना पावला पॉईंट  पाहिल्यानंतर  संध्याकाळी  पॅराडाईज क्रुझवर फिरण्याचा आनंद घेत गोवा दर्शन केले. विशेष म्हणजे ६ जूनला जाताना  मडगाव एक्सप्रेसने पनवेल ते खिवीम रेल्वे स्टेशन आणि ८ जूनला येताना जनशताब्दीने खिवीम ते पनवेल रेल्वे स्टेशनपर्यंत  सर्वांची  रिजर्वेशन करून तिकिटे  काढली होती. वास्तविक पाहता ३७२  लोकांचा रेल्वेप्रवास आणि ११ कारमधून ३५ लोकांचा रोडप्रवास असा एकूण  ४०७ लोकांच्या प्रवासाचे आयोजन करणे,  एवढे सोपे नाही. रिसॉर्टवर गेल्यानंतर  चहा, नाष्टा,  शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे उत्तम आयोजन व  नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने सोमनाथ वासकर यांनी आपल्या तरुण कार्यकर्त्यांच्या सहकार्याने  केले होते.  मुंबईतून बँजो पार्टीचे आयोजन केल्यामुळे रात्रीचा सर्वांनी नृत्याचा  आनंद घेतला. सोमनाथ वासकर हे वर्षभर गणेशोत्सव, नवरात्र उत्सव,  गुढीपाडवा मिरवणूक, महिला अष्टविनायक दर्शन,  पंढरपूर दर्शन,   रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, मोफत छत्री वाटप, नेत्र चिकित्सा शिबिर, नवी मुंबई महानगरपालिकेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करणे इत्यादी सामाजिक आणि सांस्कृतिक  उपक्रम सातत्याने राबवितात.  गोवा पिकनिकचे आयोजन सुंदर केल्याबद्दल ज्येष्ठ  नागरिकांनी सोमनाथ वासकर यांना खूप खूप धन्यवाद दिले. या आयोजनामध्ये  श्रीदत्त मित्र मंडळ, वाडा बॉईज , आचारी व्यवस्था श्री.धनंजय मुकादम,  व्यवस्थापन श्री.रणधीर सुर्वे,  जनार्दन वास्कर यांचे अनमोल सहकार्य लाभले.  ज्यांच्या  विशेष प्रोत्साहनामुळे  गोवा सहलीचे नियोजन होत असते, त्या नगरसेविका  सौ. कोमल सोमनाथ वास्कर यांचे विशेष आभार. 

आपला 

 मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel