गुणपत्रिकेसाठी एका विद्यार्थ्याकडून हजारो रुपये उकळल्याने गटशिक्षणाधिकारीकडे तक्रार

मुख्याध्यापकाने पैसे मागितल्याचे कॉल रेकॉर्डींग व्हायरल!

मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी 

                      मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने दिवसेंदिवस भ्रष्ट कारभाराचे कळस गाठल्याचे दिसून येत आहे. दहावी बोर्ड परिक्षेच्या फि भरण्यापासून ते गुणपत्रिका देण्यापर्यंत गावातील एका गरीब विद्यार्थ्याकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप. विद्यार्थ्याने मुख्याध्यापक विरोधात गटशिक्षणाधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परिक्षेत खाजगी रित्या १७ नंबरचा ऑनलाईन पद्धतीने फार्म भरून आपल्या पत्नीला परिक्षेत बसवण्याच्या  आशेने तक्रारदार यादव खंडू नवलेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक वाय डी भैरवाड यांची भेट घेतली. मुख्याध्यापकाने गरिब विद्यार्थीनीच्या पतीच्या मजबुरीच्या फायदा घेत यासाठी हजारों रुपयांची मागणी केली. याव्यतिरिक्त यादव नवलेकर यांनी स्वतः पैसे भरुन बाहेरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले असतानाही पुन्हा ऑनलाईन करण्यासाठी दोन हजार लागतात, म्हणून नगदी दोन हजार रुपये हिसकावून घेतले. यानंतर परिक्षेच्या काळात बि.ओ. कार्यालयाच्या लोकांना पैसे पाठवले तरच तुमची पत्नी पास होते असे खोटे बोलून पुन्हा दोन हजार रुपये उकळले. 

                              मात्र यादव नवलेकर यांना अनाधिकृतपणे मुख्याध्यापकाकडून येवढे आर्थिक फटके बसल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या पत्नीच्या  गुणपत्रिकेसाठी मुख्याध्यापक वाय डी भैरवाड यांनी फोन करुन चक्क दोन हजार रुपयांची पुन्हा मागणी केल्याने संतापलेल्या पतीने मुख्याध्यापकाची केलेली कॉल रेकॉर्डींग दि.५ जून रोजी मुखेड येथील संबंधित गटशिक्षणाधिकारी हामीद दौलताबादी यांच्याकडे सादर करुन लेखी निवेदनाद्वारे मुख्याध्यापक विरोधात तक्रार केली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. सदर या निवेदनावर जयभिम सोनकांबळे,मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर, मारोती गायकवाड, आसलम दौलताबादी सह आदींची स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या