भानुदास भैया कैलवाडे यांचा फळझाडे वाटून वाढदिवस साजरा.


   चाकूर----डोगरज नगरीतील युवक कार्यकर्ता तथा ग्रामपंचायत सदस्य भानुदास भैया कैलवाडे हे नाव या परिसरात सध्या चर्चेचे झाले आहे,सातत्याने सतत काही ना काही उपक्रम चालूच असतो.

      भानुदास कैलवाडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी नाविन्यपुर्ण उपक्रम राबण्यात येत असतो,गत वर्षी रक्तदान शिविर घेऊन 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.हे एक रेकार्ड झाले होते.या वर्षी पर्यावरण पुरक काहीतरी करावे या हेतूने फळझाडांची रोपे शेतकरी बांधवानां वाटप करण्यात आले.

    भानुदास कैलवाडे यांचा शाल व रोप देऊन दत्तात्रेय कांबळे व बळीराम कांबळे यांनी सत्कार केला व केक कापून शुभेच्छा दिल्या.

      सत्कारानंतर जमलेल्या शेतकरी यांना रोपे वाटण्यात आली,यावेळी गाव व परिसरातील अनेक जण उपस्थित होते,हेरचे,घोगरे,व मित्र मंडळी तर डोंगरजचे तरूण वर्ग व लहानथोर.यावेळी,अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या

टिप्पण्या