नवी मुंबई महानगरपालिका लोकाभिमुख करणार* _ खा. नरेश म्हस्के

ठाणे महानगरपालिकेत कोणताही नागरिक केव्हाही जाऊ शकतो. अधिकाऱ्यांशी बोलू शकतो. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना जाब देखील विचारू शकतो. त्याच धर्तीवर आप...





ठाणे महानगरपालिकेत कोणताही नागरिक केव्हाही जाऊ शकतो. अधिकाऱ्यांशी बोलू शकतो. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना जाब देखील विचारू शकतो. त्याच धर्तीवर आपण नवी मुंबई महानगरपालिका  लोकाभिमुख करणार. असे स्पष्ट उदगार खासदार नरेश म्हस्के यांनी काढले. 

नवी मुंबई युवा सेनेचे उपाध्यक्ष  अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात ९  जून २०२५  रोजी खा. नरेश मस्के यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी नरेश म्हस्के यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्येष्ठ नागरिक हे आम्हाला आई-वडिलांसारखे आहेत, त्यांचे जे काही प्रश्न असतील,  ते प्राधान्याने सोडवले जातील. एवढेच नव्हे तर गरज पडली तर खासदार निधीतून देखील त्यांना मदत केली जाईल.

संघाचे अध्यक्ष मारुती कदम यांनी आपल्या  भाषणात सांगितले की, संघाचे १३५० सभासद असून, या संघातर्फे ज्येष्ठांना मार्गदर्शन, व्याख्याने , आरोग्य शिबिरे, नेत्र चिकित्सा शिबिर, पुरुष व महिला योगा, कॅरम, गायन, निबंध स्पर्धा, असे अनेक विविध  सामाजिक उपक्रम राबविले जातात. माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की. नवी मुंबईत सानपाडा  हा ज्येष्ठ नागरिक संघ सर्वात मोठा असून,  या संघाला  वर्षभर उपक्रम राबविण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. तरी कार्यालयासमोर समोर जागा वाढून दिली तर बरे होईल.  एसटी महामंडळाच्या सर्व एसटी गाड्या सानपाडा येथे जाताना आणि येताना थांबल्या पाहिजेत, असे लेखी निवेदन आरोग्य संवादक सौ. अलका भुजबळ यांनी खासदार नरेश म्हस्के यांना दिले. महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी  लिहिलेली " आम्ही अधिकारी झालो " आणि " करिअरच्या नव्या दिशा"  ही दोन पुस्तके खासदार नरेश मस्के यांना भेट दिली. 

याप्रसंगी नवी मुंबई युवा सेनेचे उपाध्यक्ष अविनाश जाधव, महिला आघाडी संघटक सुरेखा गव्हाणे,  आदी मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सहसचिव शरद पाटील यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन संघाचे  खजिनदार विष्णुदास मुखेकर यांनी केले तर आभार बळवंत पाटील मानले.

आपला 

 मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel