जहाजावर महिलांना रोजगाराची संधी देणारा समझोता करार*


 *

___________________________________


 भारतीय नौकानायन क्षेत्रात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल पडत असल्याचे  जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतो की, २० जून २०२५ रोजी ॲंग्लो-ईस्टर्न शिप मॅनेजमेंट (इंडिया) प्रा. लि. आणि नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (NUSI) च्या सहकार्याने, सागरी उद्योगात महिलांच्या रोजगारास प्रोत्साहन देणारा समझोता करार (MoU) संपन्न झाला आहे, असे नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले. 

 महिला खलाशांना सक्षम करणे,  हा या कराराचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे.  यासाठी महिलांना नुसी मेरिटाईम अकादमीमध्ये सहा महिन्यांच्या जनरल पर्पज (GP) रेटिंग कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण दिले जाईल.  त्यानंतर नुसी आणि ॲंग्लो-ईस्टर्नद्वारे संयुक्त निवड प्रक्रिया होईल,  ज्यामुळे निपक्षपाती आणि गुणवत्तेवर आधारित  महिलांना  रोजगाराची संधी निश्चित मिळेल. 

 ॲंग्लो-ईस्टर्न कंपनीच्या मालकाचे नोकरीचे निकष व पूर्तता झाल्यानंतर जहाजावर रोजगाराची संधी  निश्चित मिळेल.  या सामंजस्य करारामुळे नौकानयन क्षेत्रात लैंगिक विविधता आणि समावेशाच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलत आहोत, अधिकाधिक महिलांचे स्वागत करण्यासाठी शिपिंग उद्योग प्रयत्नशील होत आहे. 

ॲंग्लो-ईस्टर्न कंपनीने घेतलेल्या या प्रगतीशील दृष्टिकोनाबद्दल आणि जहाज उद्योगात महिलांचे अधिक भविष्य घडवण्याच्या  वचनबद्धतेबद्दल आम्ही कंपनीचे  आभार मानतो.  आम्ही एकत्र येऊन भारतातील महिला खलाशांची पुढील पिढी घडवत आहोत. असे मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.

टिप्पण्या