सानपाडा येथे वस्त्रोद्योग मंत्रालयाची वंचित महिलांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा*


___________________________________


भारतातील गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखाली एटीडीसी म्हणून ओळखले जाणारे एपरेल ट्रेनिंग अँड डिझाईन सेंटरच्या भारतात विविध ठिकाणी ८५  केंद्र आहेत.  त्यापैकी सानपाडा रेल्वे स्टेशनच्या इमारतीमध्ये एक केंद्र आहे. भारतातील सर्वात मोठ्या दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षण प्रदात्यापैकी एक केंद्र आहे.   भारतातील प्रमुख परिधान क्लस्टर मध्ये सुमारे ७८ टक्के वेतन प्लेसमेंट आहेत.  या केंद्रामधून डिप्लोमा तसेच बी. व्हि.ओ.सी. पदवीचे कार्यक्रम दिले जातात.   या केंद्राच्या वतीने  २५ गरजू महिलांसाठी टाकाऊ कपड्यांपासून विविध उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यशाळा २ जून ते ६  जून  २०२५ च्या दरम्यान सानपाडा येथे झाली. या कार्यशाळेत एटीडीसीने वंचित महिलांचे कौशल्य वाढविण्यासाठी पाच दिवसाची कार्यशाळा पूर्ण केली. ही कार्यशाळा टीसर इंडियाने आयोजित केली होती. कार्यशाळेत टाकाऊ कपडे पुन्हा वापरण्याचे आणि त्यांना ट्रेन्डी आणि दैनंदिन वापराच्या पिशव्या बनवण्यासाठी अपसायकल करण्याची कौशल्य प्रदान करण्यात आले. टाकून दिलेले कपडे गृहनिर्माण संस्थेकडून घेऊन विविध वापरासाठी पिशव्या बनवण्यासाठी पुन्हा वापरण्यात येतात.  व्यावसायिक प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर, या  वंचित महिला आपले जीवन जगू शकतात.  टाकाऊ कापडापासून विविध उत्पादनांचा पुनर्वापर करण्याचे अनेक केंद्र आहेत. सर्व एटीडीसी केंद्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना प्रशिक्षण देण्याची ही प्रक्रिया सतत चालू असते. त्यातुनच वंचित महिला स्वतःची उपजीविका करण्यासाठी तयार होतात. वंचित महिलांसाठी सानपाडा केंद्रात कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल आणि गरजू  महिलांना मदत केल्याबद्दल एटीडीसी केंद्राच्या प्राचार्य श्रीमती पल्लवी राय यांचे आभार मानण्यात आले.  कार्यशाळे दरम्यान विद्यार्थ्यांना भेटून  त्यांना प्रेरित करण्यासाठी सानपाडा येथील नगरसेवक श्री. सोमनाथ  वास्कर यांनी कार्यशाळेला भेट दिली. 

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या