भारतीय व आंतरराष्ट्रीय महासागरात चालणाऱ्या जहाजावरील खलाशी कामगारांची नुसी ही मान्यताप्राप्त कामगार संघटना आहे. दीड लाख सभासद संख्या असलेली नुसी ही कामगार संघटना भारतीय कामगार चळवळीतील एक महत्त्वाची कामगार संघटना आहे. या संघटनेला १२८ वर्षाचा इतिहास आहे. कोलकत्ता येथे २५ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय नाविक दिनाच्या मुहूर्तावर नव्याने खरेदी केलेल्या जागेत नुसी कामगार संघटनेच्या कार्यालयाची सुरवात करून एक चांगला टप्पा गाठल्याचा निश्चितच अभिमान आहे. यामुळे भारतीय खलाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुधारित पायाभूत सुविधा उपलब्ध करून चांगली सेवा देण्याचे काम वचन दिल्याप्रमाणे नुसी करणार आहे. असे नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया या संघटनेचे सरचिटणीस व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.
या शाखेचे उद्घाटन कॅप्टन राजेश टंडन, वरुण पुरस्कार विजेते आणि फॉरेन ओनर्स रिप्रेझेंटेटिव्हज अँड शिप मॅनेजर्स असोसिएशन (FOSMA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॅप्टन एस. एम. हळबे, मेरीटाईम असोसिएशन ऑफ शिपओनर्स, शिपमॅनेजर्स अँड एजंट्स (MASSA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्तपणे केले.
याप्रसंगी कोलकत्ताचे सहपोलीस आयुक्त शुभंकर भट्टाचार्य हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी खलाशी कामगारांना शुभेच्छा देऊन , खलाशी कामगारांच्या कल्याणासाठी नुसीने केलेल्या योगदानाचे कौतुक केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. नुसीचे सरचिटणीस आणि खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, खलाशी आणि पाहुण्यांचे स्वागत करून आपल्या भाषणात सांगितले की,भारतीय खलाशी कामगारांना कल्याणाकारी सेवा देण्यासाठी हा एकनवीन मार्ग आहे.आंतरराष्ट्रीय नाविक दिनानिमित्त या उद्घाटनाचा योग जुळल्यामुळे भारतीय महासागरातील खलाशी कामगारांसाठी या प्रसंगाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. या कार्यक्रमाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे खलाशांच्या तरुण आणि उत्साही मुलाने “खलाशाची भूमिका” या विषयावर दिलेले हृदयस्पर्शी भाषणात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील खलाशांचे अमूल्य योगदान स्पष्टपणे मांडले. राष्ट्रसेवेत ते व त्यांचे कुटुंब करत असलेल्या त्यागावर त्यांनी प्रकाश टाकला. त्या मुलाचे भाषण खलाशी कामगारांच्या जीवनाला दिशा देणारे होते. असे मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा