मालवण येथे नुसीतर्फे पाच जिल्हा परिषद शाळांना संगणक संचांचे वाटप




 मालवण: भारतात जहाजावर काम करणाऱ्या सर्वात मोठ्या नाविक कामगारांच्या नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (NUSI) या कामगार संघटनेतर्फे सामाजिक  बांधिलकीच्या उपक्रमातून  मालवण तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाच जिल्हा परिषद शाळांना २५ मे  २०२५ रोजी संगणक संचांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत सर्जेकोट, खैदा, कोळंब, न्हीवे आणि कातवड या जिल्हा परिषद शाळांचा समावेश होता.

सदर उपक्रम नुसीचे सरचिटणीस मा. श्री. मिलिंद कांदळगांवकर यांच्या हस्ते संपन्न झाला. आधुनिक युगाच्या  गरजांशी सुसंगत होण्यासाठी  त्यांची पायाभरणी करणे, त्याचप्रमाणे संगणक व तंत्रज्ञानाचे प्राथमिक शिक्षण मिळावे हा कांदळगावकर यांचा  त्यामागील मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमप्रसंगी सर्व पाच शाळांचे शिक्षक, स्थानिक पालकवर्ग, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थांनी आणि शिक्षणप्रेमींनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.

नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगांवकर यांनी आपल्या प्रेरणादायी  मार्गदर्शनपर भाषणात संगणक शिक्षणाचे आजच्या काळातील महत्व विशद करून सांगितले की, “आजचा काळ हा डिजिटल युगाचा आहे. संगणकीय ज्ञानाशिवाय पुढे जाणे अशक्य आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही या नवतंत्रज्ञानात पारंगत व्हावे, यासाठी नुसीकडून हा केलेला प्रयत्न आहे.”

टिप्पण्या