*क्रीडा राज्य मंञी रक्षा खडसे यांच्या हस्ते ट्रॉफी*
क्रीडा प्रतिनिधी (गणेश माळवे)- दिवच्या घोघला बिच वर 19 ते 24 मे 2025 पासून पार पडलेल्या पहिल्या खेलो इंडिया बिच गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राने ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि १० कांस्य पदके जिंकली व महाराष्ट्र संघाने उपविजेता चषक पटकावला. पिंच्याक सिलॅट हा महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त यशस्वी खेळ ठरला, ज्यात ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य पदक (एकूण 12 पदके) मिळाली. यामुळे राज्याला पदक तालिकेत पहिल्या दोन स्थानांमध्ये येण्यास मोठा हातभार लागला. महाराष्ट्राला एक रजत पदकाच्या कमतरतेमुळे ओवरऑल चॅम्पियनशिप च्या चषकाला मुकला गेला .ओपन वॉटर स्विमिंगमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत २ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदके (एकूण ५ पदके) महाराष्ट्राने पटकावली. याशिवाय, बीच कबड्डीमध्ये २ कांस्यपदके आणि बीच सॉकरमध्ये १ कांस्यपदक मिळवत, सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले.
माननीय श्रीमती रक्षा निखिल खडसे, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या संघाला दीव येथे झालेल्या खेलो इंडिया बीच गेम्समध्ये उपविजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. ह्यावेळी
महाराष्ट्राचे क्रीडा उपसंचालक श्री नवनाथ फडतरे,
श्री किशोर येवले सर मुख्य प्रशिक्षक महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट व राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन , क्रीडा अधिकारी अक्षय कोटलवार, अरुण पाटील व महाराष्ट्राचे खेळाडू हे चषक घेण्यास उपस्थित होते. महाराष्ट्र संघाचे कौतुक व अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा