नांदेड | (१७ एप्रिल २०२५) —
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला’ अंतर्गत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता” या विषयावर विशेष व्याख्यानात वरील उदगार डॉ. नारायण कांबळे यांनी काढले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर यांनी भूषवले. प्रमुख वक्ते म्हणून स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. नारायण कांबळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास माजी प्र- कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन कक्षाचे माजी संचालक डॉ.रवी सरोदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप पाईकराव आणि परीक्षा केंद्रप्रमुख डॉ.शिवराज बोकडे यांची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजनाने करण्यात आला.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यासोबतच अर्थविषयक विचारसरणीवर सखोल विचार मांडले. डॉ. आंबेडकर हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर एक अर्थतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि राज्यघटनाकार होते. त्यांच्या औद्योगिक धोरण, आर्थिक नियोजन, श्रमिक व कृषक हितासाठीचे विचार आजही अत्यंत उपयुक्त ठरतात, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
प्रमुख वक्ते डॉ. नारायण कांबळे यांनी आपल्या सखोल आणि अभ्यासपूर्ण व्याख्यानात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास, कार्य आणि तत्त्वज्ञान यांचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून, ते भारतीय समाजातील प्रत्येक घटकासाठी स्वातंत्र्य, न्याय, समता व बंधुतेचा संदेश देतात. त्यांनी सांगितले की, "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा बाबासाहेबांचा संदेश आजही युवकांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणप्रेमावर, स्त्री सक्षमीकरणासाठी लढा, हिंदू कोड बिलातील योगदान, व संविधाननिर्मितीतून दिलेली मूलभूत मूल्ये यांचे सविस्तर विश्लेषण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, फक्त जयंती साजरी करणे नव्हे, तर आंबेडकर विचारांचा अंगीकार करणे हे खरे अभिवादन आहे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसंपन्न कार्यपद्धती व आजच्या काळात त्यांची उपयुक्तता अधोरेखित केली. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे त्यांचे घोषवाक्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी केले आणि आभार प्रा.भारती सुवर्णकार यांनी मानले.
व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य डॉ.गौतम दुथडे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, डॉ.साईनाथ शाहू, डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ.राजरत्न सोनटक्के, डॉ. मीरा फड, डॉ.शांतुलाल मावसकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल. व्ही. पदमारानी राव, सहसमन्वयक डॉ.एस.एल.शिंदे, डॉ.अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रशांत मुंगल, पोशट्टी अवधूतवार आदींनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा