*खेलो इंडिया युथ गेम्स साठी परभणी जिल्हा सेपक टकारा खेळाडूंची निवड चाचणी*



परभणी (.         )क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर, महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशन वतीने 7 वी युथ खेलो इंडिया गेम्स 2025 बिहार येथे 04 ते 15 मे दरम्यान संपन्न होणार आहेत. करीता महाराष्ट्र राज्य निवड चाचणी दि. 22 ते 23 एप्रिल दरम्यान विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे संपन्न होणार आहे. 

      परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा सेपक टकारा असोसिएशन वतीने  परभणी जिल्हा तील उत्कृष्ट सेपक टकारा खेळाडू ची निवड दि. 18 एप्रिल दरम्यान सेलू नूतन विद्यालय येथे होणार आहे. या निवड चाचणी करीता 1/1/2007 नंतर चा जन्म तारीख असावी. खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, जन्म तारीख प्रमाणपञ , बोनाफाईड प्रमाणपञ, आणावे.

निवड चाचणी साठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, सुयश नाटकर, परभणी जिल्हा सचिव गणेश माळवे, प्रा.महमंद इकबाल, प्रशांत नाईक ,किशोर ढोके, संजय भुमकर यांनी केले आहे.

टिप्पण्या