श्रीनिकेतन शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन



नांदेड/प्रतिनिधी.. दीपक नगर तरोडा बुद्रुक भागातील श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक यशवंत थोरात यांची उपस्थिती होती.
 कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या   प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण  करुन अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला पण आपण डॉ. बाबासाहेब समजून घेतले नाही, डॉ. बाबासाहेब समजून घेण्यासाठी त्यांचे विचार आपण शिक्षक या नात्याने कृतीत आणणे व त्याचा पुरेपूर फायदा आपल्या विद्यार्थ्यांना करून देऊन, विद्यार्थ्यात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी शाळेत कायमस्वरूपी वाचन कट्टे निर्माण कराव्यात अशा सूचना अध्यक्षीय समारोपप्रसंगी मुख्याध्यापिका डॉ.सौ. एस.एन.राऊत यांनी देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.  
आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक यशवंत थोरात, सौ. कांचन 
घोटकेकर,सौ. कांचन सोनकांबळे, सौ.नीता जगधने, चोबळे मॅडम, मोरताडकर मॅडम,सौ. सुरेखा मरशिवणे,मोगल, पवार,बनसरे, सूर्यवंशी, आयनेले, कल्याणकर, दंडेकर, कळकेकर,व्हनशेट्टे, इंगोले ,राठोड,माळेगावे,आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून डॉ. आंबेडकरांचे विचार विद्यार्थ्यांत रुजवण्याची गव्हाई दिली. कार्यक्रमांचे सूञसंचलन आयनेले यांनी केले तर उपस्थितांचे आभार गतीश मगरे यांनी मानले.
टिप्पण्या