:विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
:अनेक बौद्धिक तसेच चर्चासत्रांचे आयोजन
- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शा.शि.शिक्षक महामंडळ अमरावती,महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, शारीरिक शिक्षण शिक्षक युनिट मुंबई मनपा, वाहतूक सुरक्षा दल व नागरी संघटना व इतर सर्व सहयोगी संघटना यांच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तर' शारीरिक शिक्षण शिक्षक महाक्रीडाअधिवेशन दि.12 ते 14 एप्रिल रोजी 'सप्तपदी मंगल कार्यालय शिर्डी' जि.अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
*मान्यवरांच्या उपस्थितीत १३ एप्रिलला शानदार उद्घाटन सोहळा....*
सलग तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 12 रोजी सायंकाळी ६ वा. रिपोर्टिंग आणि ध्वजारोहण,
रविवार दि. 13 एप्रिल रोजी स.७.३० चहापाणी व अल्पोपहार,स. ८.३० वा. यांच्या मार्गदर्शनाखाली 'योगा व प्राणायाम
तर स.9. 45 ते स.10:45 वा. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या शुभहस्ते शानदार उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तामामा भरणे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून माजी खास. डॉ.सुजय विखे पाटील
उपस्थित राहणार आहेत. याशिवाय शिर्डी मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे सदस्य संग्राम जगताप, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आशितोष काळे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सत्यजित तांबे, किशोर दराडे, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे सदस्य अमोल खताळ, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे सदस्य हेमंत ओगले , शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, शिर्डी साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र पुणे क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक सुधीर मोरे, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर, श.को.स.का. कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे तर बालभारती पुणेचे अधिकारी संदीप निकम आदी मान्यवरांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
तरी २ रे शारीरिक शिक्षण शिक्षक महाक्रीडाअधिवेशनला राज्यभरातील शारीरिक शिक्षण शिक्षकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे, शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, समितीचे सचिव ज्ञानेश काळे, महामंडळाचे अध्यक्ष डॉ अरुण खोडस्कर, आयोजन समितीचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष राजेश जाधव, संजय चव्हाण, सचिव डॉ आनंद पवार व सहसचिव डॉ मयुर ठाकरे यांनी तसेच इतर सर्व सहयोगी संघटना पदाधिकारी यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा