प्रतिनिधी सेलू.
सेलू : सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील ह. मु.सेलू येथील रहिवासी असलेले डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांची भारत सरकारच्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या शिफारस पत्राचा आणि डॉ शिवाजी रामभाऊ शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून रेल मंत्रालय आश्विनी वैष्णव यांच्या विशेष अभिरुचि अंतर्गत परभणी जिल्ह्यातील डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांची रेल्वे बोर्ड सदस्य पदी नियुक्ती केली. डॉ . शिवाजी शिंदे हे परभणी जिल्ह्यातील पहिले रेल्वे बोर्ड सदस्य म्हणून नियुक्त झाल्यामुळे जिल्ह्याच्या नाव लौकिकात त्यांच्या रूपाने भर पडली असून लवकरच ते रेल्वे बोर्ड सदस्य म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. या अगोदर सुद्धा त्यांनी आपल्या सेलू येथील नूतन कन्या प्रशालेच्या ग्रंथपाल पदावर असताना वाचन चळवळ वाढावी म्हणून अनेक उपक्रम राबवले होते.त्यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना तीन वेग वेगळ्या विद्यापीठाने शैक्षणिक आणि सामाजिक कार्या बद्दल "डॉक्टरेट या बहुमान पदवीने सन्मानित करण्यात आले असून देशातील विविध राज्यातील संस्था, सामाजिक फाउंडेशन यांनी वेग वेगळे पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.त्यांना भारत भूषण, कर्नाटक साहित्य रत्न, कर्नाटक भूषण, भारतीय राष्ट्रीय एकता गौरव पुरस्कार आदींनी सन्मानित केले आहे. यापुढे देश पातळीवर त्यांना रेल्वे बोर्ड सदस्याच्या माध्यमातून रेल्वे प्रवाश्याच्या सुख सुविधा मध्ये वाढ करणे,अडीअडचणीवर समाधानकारक उपाय योजना राबवणे आदी कार्य करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.त्यांची रेल्वे बोर्डा द्वारा नियुक्त क्षेत्रीय रेल्वे उपयोगकर्ता, सल्लागार समिति, उत्तर मध्य रेलवे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. या
समिति अंतर्गत सदस्य म्हणून रेल्वे विभागा अंतर्गत संतुलित आहार,पैंट्री कार, बुक स्टॉल आदि सेवाचे निरीक्षण करून रेल्वे प्रवाशांच्या सेवेत वाढ कशी करता येईल याचा विचार करून सल्ला घेतला जाईल. या निवडी बद्दल डॉ शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे पाटिल,महेशराव वैजनाथराव आकात तथा भारतीय रेल्वे मंत्री मा.ना.श्री अश्विनी वैष्णवजी यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त केले.स्थानिक पत्रकाराशी बोलतांना त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुख सुविधा वाढीसाठी सदैव प्रयत्न करणार असून विविध भागातील स्थानिक स्थानकाचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉ. शिवाजी शिंदे यांच्या रेल्वे बोर्ड सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्था चे माजी सचिव प्राचार्य द.रा.कुलकर्णी सर,संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया सर, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे सर,सचिव व्हि. के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहानी, कार्यकारणी सदस्य नंदकिशोरजी बाहेती, डॉ.शरद कुलकर्णी, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मुकेश हरिभाऊकाका बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, सोनवटीचे सरपंच मधुकर नाना सोळंके, जनाआबा सोळंके, श्याम पाटील गजमल, सेलू तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार कांचन कोरडे, जयचंद खोना, सदस्य पूनमचंद खोना व सर्व पत्रकार बंधू,निपाणी टाकळी चे माजी चेअरमन अविनाश शिंदे, सरपंच सुनील सावंत, ग्रामसेवक जयराम नटवे, सेलू रेल्वे स्टेशन चे स्टेशन मास्तर अविनाश कुमार सर,आर्या सर, स्थानिक मित्र मंडळीने भर भरून शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा