नवी मुंबई सानपाडा येथील सेक्टर ८ मध्ये सुयोग सोसायटीत राहणारे समाजसेवक अजय पवार आणि त्यांचे सर्व सुयोग समूह मधील दिलदार मित्र, शिवसेना शाखा सहकारी , गार्डन ग्रुप ७:५० मधील काही सहकारी मिळून दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. वृक्षारोपण केल्यानंतर पुढे ती झाडे जगण्याची ही जबाबदारी घेतली जाते.
जिथे कुठे झाडे लावली आहेत त्याच्या जवळच्या .यशोवर्धन सेक्टर ८, गुरुकृपा से. ३, शिवसागर से.२ , सुयोग समूह आणि शिवत्रिवेनी धाम से.८ या संस्थांकडून पाणी घेऊन त्या झाडांना पाणी दिले जाते. लावलेली सर्व झाडे जगवतो, याकामी विकास वाघुले, अनिल गव्हाणे व दिलदार मित्र यांचे विशेष सहकार्य लाभते.
यापुढेही हा उपक्रम चालूच रहाणारआहे. प्रत्येक वर्षी किमान ५ ते १० झाडे लावायची आणि ती जगवायची असा वर्षानुवर्ष सामाजिक उपक्रम आहे, वृक्षारोपण धर्म महान, एक पेड दसपुत्र समान. वृक्षारोपणा बरोबरच त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. असे सानपाडायचे समाजसेवक व नवी मुंबई उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विभागप्रमुख अजय पवार यांनी सांगितले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा