जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्यावतीने 10 एप्रिल हा "राष्ट्रीय भूमापन दिन" साजरा


नांदेड दि. १० एप्रिल :- देशभरात 10 एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय भुमापन दिन’ म्हणून साजरा केला जातो. सर्वेक्षणाच्या इतिहासात या दिवसाला विशेष महत्त्व आहे .कारण याच दिवशी मेजर विल्यम लॅम्बटन यांनी GTS (महान त्रिकोणमितीय सर्वेक्षण) आणि केप कोमोरिन ते बंगलोरपर्यंत ग्रेट आर्क मोजण्याचे काम 10 एप्रिल 1802 रोजी सुरू केले. 

त्याअनुषागाने भूमि अभिलेख विभागामार्फत  भुमापन दिन कै. डॉ शंकरराव चव्हाण, नियोजन भवन नांदेड येथे साजरा करण्यात आला.

भूमापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राहूल कर्डीले हे होते.भूमापन दिनानिमित्त अधिनस्त उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांना  जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मोजणी साहित्य रोव्हर्स वाटप करण्यात आले.तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजनजिल्हाभूमी अभिलेख अधीक्षक श्रीमती सिमा देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अधिनस्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या