लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी लवकरच कार्यकारिणीची निवड होणार पत्रकारांचे घरांचे स्वप्न होणार पूर्ण

लातूर दि.८(प्रतिनिधी)- मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून लवकरच ग्रहनिर्माण संस्थेची   कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. पञकारांच्या घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल  अशी माहिती गृहनिर्माण संस्थेचे सर्वेसर्वा नरसिंह घोणे यांनी दिली आहे. 
       2019-20 या वर्षी पत्रकार गृहनिर्माणसाठी बाभळगाव येथील गट नंबर 18 आणि 41 येथे जागेची खरेदी करण्यात आली होती .  लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या., गट नं. १८ आणि ४१, मौजे बाभळगाव, एन.ए.नं.२०२४/जेएमबी-१/डेस्क-१/लातूर/सीआर-४८ दि.१४/०३/२०२४, प्लॉट नंबर ०१ ते ०२, नविन रिंग रोड, सारोळा- बाभळगाव रोड, बाभळगाव, ही संस्था नोंदणी क्रमांक एलटीआर/एलटीआर/एचएसजी (टीओ)/१४७६/२०२५, दिनांक :- ०४/०४/२०२५ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र नियम क्रमांक XXIV) कलम ९ (१) आणि कलम १५४ (ब) (२) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.
         


    नियोजित लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण संस्थेची वसाहत पूर्ण करण्यासाठी संस्थेची  कार्यकारणी लवकरच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर गृहनिर्माण कार्याच्या भुमीपुजनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे असेही गृहनिर्माण संस्थेचे सर्वेसर्वा नरसिंह घोणे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या