_महिला कामगार संघर्षातून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा _ सौ संज्योत वढावकर_

नवी मुंबई सानपाडा येथील मिलेनियम टॉवर्स बी टाईप हाऊसिंग सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ८ मार्च हा " आंतरराष्ट्रीय महिला दिन"  साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा अध्यक्ष व सचिवांच्या हस्ते श्रीफळ,  पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय हिंद मजदूर  सभेच्या महिला नेत्या सौ. संज्योत वढावकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,  जगातील अनेक महिला कामगारांनी संघर्ष करून आठ तासाचा दिवस व इतर मागण्या मिळवून घेतल्या आहेत. मात्र आजही महिलांवर अत्याचार,  विषमता, असुरक्षितता देशाच्या विविध भागात दिसून येत आहे.  आपल्या देशातील दिल्लीतील निर्भया प्रकरण, मणिपूर प्रकरण, बदलापूरमधील स्त्री अत्याचार व नुकतेच पुणे स्वारगेट येथील महिलेवरील अत्याचार यासारखे अन्याय दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आपण सर्व महिलांनी जागरूक राहुन आपल्या हक्काचे संरक्षण केले पाहिजे. महिलांच्या मागण्या मिळविण्यासाठी  सरकारचे लक्ष वेधून घेणे गरजेचे आहे.   महिलांना आपल्या कामाचे कौतुक कोणीतरी करावे असे वाटते. कोणतेही माणसाला आपल्या कामाचं कौतुक केलं तर बरे वाटते.  आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे, त्यासाठी विषमता दूर करून समानता येणे काळाची गरज आहे. स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण व जगात शांतता निर्माण व्हावी यासाठी जगात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.

सुरुवातीला पाहुण्यांचा परिचय मॅनेजिंग कमिटी मेंबर व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी  संपादक श्री . मारुती विश्वासराव यांनी करुन दिला.  सोसायटीचे अध्यक्ष श्री.  बलजीत सिंग अरोरा, सचिव श्री. सचिन तावडे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन सौ. स्वाती सावंत व सिद्धार्थ रायगावकर यांनी उत्कृष्ट केले. याप्रसंगी सोसायटीच्या महिला मॅनेजिंग कमिटी मेंबर सौ. शुभांगी रेवाळे व अंजली केंद्रे उपस्थित होत्या. महिला दिनाच्या कार्यक्रमास मॅनेजिंग  कमिटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते.  महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला दिनानिमित्त महिलांसाठी फॅशन शो,  टिकली लावणे,  संगीतमय गाणे ओळखने, मैत्री कारंडे यांचे नृत्य  अशा प्रकारचे विविध कार्यक्रम झाले. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

टिप्पण्या