- प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे
नांदेड:( दि.३ मार्च २०२५)
विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक उपक्रमात मनोरंजक पद्धतीने सहभाग घ्यावा आणि सादरीकरण करावे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्तरावर आविष्कार, अन्वेषण, आव्हान, अश्वमेध आदी स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती विकसित होणे गरजेचे आहे त्याकरिता यशवंत युवक महोत्सवांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांकरिता कृत्रिम बुद्धिमत्ता हा महत्त्वपूर्ण विषय निश्चित करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती आणि आवड निर्माण झाल्यास त्याद्वारे निश्चितच रोजगार प्राप्ती देखील होऊ शकेल, असे प्रतिपादन माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात आयोजित युवक महोत्सव:२०२५ अंतर्गत स्टुडन्ट प्रेसेंटेशन या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दि.३ मार्च रोजी ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, युवक महोत्सव समन्वयक डॉ.एम.एम.व्ही.बेग, स्टुडन्ट प्रेसेंटेशन समन्वयक डॉ.संजय ननवरे, स्पर्धेचे परीक्षक सायन्स महाविद्यालयातील डॉ. भागवत गचांडे व डॉ. डी.आर.मुंडे, पीपल्स महाविद्यालयातील डॉ.दत्तात्रय यादव, प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील डॉ. निळकंठ पाटील यांची उपस्थिती होती.
परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉ. भागवत गचांडे यांनी, विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्याकरिता ज्ञान सभाधिटपणा आणि ज्ञानाचे उत्कृष्ट सादरीकरण करणे आवश्यक आहे, असे सांगितले.
युवक महोत्सवात एकूण २८९ स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून स्टुडन्ट प्रेझेंटेशन सादरीकरणामध्ये ९१ विद्यार्थी सहभाग घेत आहेत.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ. एम.एम.व्ही. बेग यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.साईनाथ बिंदगे यांनी केले तर आभार डॉ.अजय मुठे यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता डॉ.धनराज भुरे, प्रा.प्रियंका सिसोदिया, डॉ.मोहम्मद आमेर, प्रा.शांतूलाल मावस्कर, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, के.एस. इंगोले, गोविंद शिंदे, डी.आर. टरके, एम.आर. कल्याणकर, बी.एल.बेळीकर यांनी परिश्रम घेतले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा