नांदेड:( दि.७ मार्च २०२५)
यशवंत महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत 'अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे व अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.पी.आर. मुठ्ठे यांच्या मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदरील कार्यशाळा दोन सत्रात पार पडली. पहिल्या सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील डॉ. बी. आर. भोसले हे लाभले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. डी. डी. भोसले यांनी केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात यशवंत महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील डॉ.बालाजी भोसले यांनी, संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनातील 'संशोधन आराखडा' यासंदर्भात मार्गदर्शन केले.
याच सत्रात दुसऱ्या भागात अर्थशास्त्र विभागातील डॉ.डी.ए.पुपलवाड यांनी 'संशोधन साहित्याचा आढावा’ याविषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले तर तिसऱ्या भागात ग्रंथपाल डॉ.के.एन. वडजे यांनी, विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये माहिती संकलित करण्यासाठी ऑनलाइन स्रोतांचा वापर करण्याच्या दृष्टीकोणातून विविध संकेत स्थळांसंदर्भात माहिती करून दिली.
दुपारच्या सत्रात वाणिज्य विभागातील डॉ.मोहम्मद आमेर यांनी, 'गृहीतकृत्याची मांडणी आणि गृहित कृत्याची चाचणी' या विषयावर तांत्रिक दृष्टीकोनातून निर्माण होणाऱ्या समस्या कशा पद्धतीने सोडवायच्या, गृहितकृत्याची मांडणी कशी करायची, याची पडताळणी करण्यासाठी कुठल्या चाचण्यांचा वापर यावर मार्गदर्शन केले.
त्यानंतर अर्थशास्त्र विभागातील डॉ.डी.डी. भोसले यांनी, 'संशोधन अहवाल लेखन' यावर मार्गदर्शन केले तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.पी. आर. मुठे यांनी, विद्यार्थ्यांना 'संदर्भ लेखन पद्धती' संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ. एच.एस. पतंगे यांनी केला तर आभार डॉ.डी.ए. पुपलवाड यांनी मानले.
कार्यशाळेसाठी डॉ.एस.डी आवळे, प्रा. नयना देशमुख, प्रा. राहुल लिंगमपल्ले, डॉ.संतोष पाटील, डॉ.योगिता पवार यांनी परिश्रम केले तसेच अर्थशास्त्रातील संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यशाळेस उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ. एल.व्ही.पदमाराणी राव, प्रबंधक संदीप पाटील, डॉ.अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, लेखा विभागातील अभय थेटे,जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा