*टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत महीला व पुरुष गटात विजयी सलामी* *महाराष्ट्र महिला संघाने दिल्ली व तामिळनाडू ला नमविले*


डेहराडून:-(गणेश माळवे )

३८ वी नॅशनल गेम्स उत्तराखंड टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत गट अ मध्ये महाराष्ट्र , दिल्ली, उत्तराखंड, तामिळनाडू साखळी सामन्यात पहिला महिला गटात सामना  महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली महाराष्ट्र संघाने 3-0 सेट मध्ये विजय प्राप्त केला.

यात तनिशा कोटेचा वि. गरीमा गोयल चा 11-5,11-5,11-6 सरळ सेटमध्ये पराभव केला.

सायली वाणी वि. लक्षिजा नारंग हिचा 11-8,11-5, 9-11,11-5 अशा सेट मध्ये 

3-1 विजयी ठरली‌.

तिसऱ्या सेट कर्णधार दिया चितळे वि. वनशिखा बार्गे दरम्यान 12-10,11-8,11-9 सरळ 3-0 सेट विजयी सलामी दिली.

पुरुष  ब गटात महाराष्ट्र, वेस्ट बंगाल, उत्तराखंड, दिल्ली साखळी सामन्यात पहिला सामना .

महाराष्ट्र वि. वेस्ट बंगाल दरम्यान 

दिपीत पाटील वि. आकाश पाल दरम्यान 11-7,3-11, 11-8, 13-11,11-8 अशा अतितटी चुरशीची लढत होऊन महाराष्ट्र च्या दिपीत पाटील यांनी 3-2 सेट मध्ये सामना जिंकला.

दुसरा सेट रेगन अल्बुकर्क वि. अनिरभान घोष दरम्यान 13-11,11-7,11-6 सरळ 3-0 सेट ने मात केली. 

तिसरा सेट यश मोदी वि. अनिकेत सेन दरम्यान9-11,11-9,9-11,

11-8,11-8, अतितटी लढतीत 3-2 सेट मध्ये महाराष्ट्र विजयी ठरला.महिला गटातील दुसरा सामना महाराष्ट्र वि. तामिळनाडू दरम्यान 

तनिषा कोटेचा वि. काव्यश्री बस 8-11,12-10,11-5,

2-11,11-4,  3-2 सेट मध्ये डाव जिंकला.

दिया चितळे वि. सेलेना एस दरम्यान 11-9,11-3,11-8 सरळ सेट मध्ये डाव जिंकला.

रिथ रिशा टेनिसन वि मानिनी शिवास ,5-11,11-8,11-9

5-11,8-11,  हा डाव तामिळनाडू 

तनिषा कोटेचा वि. सेलेना एस दरम्यान 10-11,4-11,15-13,11-7,11-7, अशा चुरशीची लढत देऊन तनिषा कोटेचा महाराष्ट्र सामना 3-1सेट मध्ये जिंकला. 

महिला संघास आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुनील बाब्रास, पुरुष संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक महेंद्र चिपळूणकर संघ व्यवस्थापक म्हणून श्रीराम कोनकर, गणेश माळवे हे काम पाहत आहेत.

टिप्पण्या