नांदेड:( दि.९ फेब्रुवारी २०२५)
जीवनात उत्कर्षासाठी सर्व व्यक्तींना समान संधी मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वयंविकासाच्या आणि सेवेच्या क्षमता असतात. त्या क्षमता समान संधी प्राप्त झाल्यानंतरच विकसित होतात, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषध निर्माणशास्त्र शाखेचे विभागप्रमुख डॉ.शैलेश वढेर यांनी केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एल.व्ही.पद्माराणी राव होत्या.
याप्रसंगी विचारमंचावर समान संधी सेलचे समन्वयक डॉ.संभाजी वर्ताळे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात डॉ.संभाजी वर्ताळे म्हणाले की, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेल काम करते. या सेलचे उद्दिष्ट सर्व विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण देणे असते. महाविद्यालयातील विविध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी धोरणे आणि कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर देखरेख करणे. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि इतर सोयी सुविधा संदर्भात मार्गदर्शन आणि समुपदेशन हा कक्ष करतो.
पुढे बोलताना डॉ.शैलेश वढेर म्हणाले की, सर्व इच्छुक व्यक्तींना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असते. यामध्ये वय, लिंग, धर्म, वंश, राष्ट्रीय मूळ किंवा शारीरिक व मानसिक अपंगत्व यासारख्या घटकांवर आधारित भेदभाव न करणे समाविष्ट आहे. रोजगारात, शिक्षणात समान संधी उपलब्ध असावयास हवी. समान संधीमुळे सर्व घटकातील विद्यार्थ्यांना विकासाची उत्तुंग शिखरे गाठता येतात, भेदभाव होत नाही तसेच सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची विशिष्ट संसाधने मिळतात.
या कक्षाचे सदस्य राज्यशास्त्र विभागातील डॉ. वीरभद्र स्वामी, रसायनशास्त्र विभागातील डॉ.अनिल कुवर, भौतिकशास्त्र विभागातील प्रा.राठोड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे,डॉ.विजय भोसले, डॉ.सुभाष जुन्ने, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ.संदीप खानसोळे, डॉ.दत्ता कवळे, डॉ.स्नेहलकुमार पाटील, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा