*'युवा उमेद'च्या रोजगार मेळावापूर्व प्रशिक्षणाला आज प्रारंभ* *भोकर विधानसभा मतदारसंघात २५ ठिकाणी प्रशिक्षण होणार*

नांदेड, दि. ४ फेब्रुवारी २०२५: 


आ. श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी 'युवा उमेद' उपक्रमांतर्गत रोजगार मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले असून, बुधवारी बारड येथून त्याचा प्रारंभ होईल. भोकर विधानसभा मतदारसंघात एकूण २५ ठिकाणी हे प्रशिक्षण होणार आहे.

शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेडच्या वतीने येत्या २२ फेब्रुवारी रोजी अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, हैद्राबाद, चेन्नई, बंगळूरु आदी शहरातील सुमारे १०० कंपन्यांचा सहभाग अपेक्षित असून, १० वी किंवा १२ उत्तीर्ण, आयटीआय, पदवी/पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध असेल. २२ फेब्रुवारीला रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना मुलाखतीची तयारी कशी करावी, या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केल्यास ते अधिक आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जातील, या हेतूने आ. श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर, मुदखेड, व अर्धापूर या तीनही तालुक्यात मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

बुधवारी ५ फेब्रुवारीला दु. ४ वा. बारड,  सायं. ५ वा. मेंढका, ६ फेब्रुवारीला स. १० वा. दाभड, स. ११ वा. येळेगाव, दु. ४ वा. देवठाणा, सायं. ५ वा. किनी, ७ फेब्रुवारीला दु. ४ वा. रावणगाव, सायं. ५ वा. पिंपळढव, ८ फेब्रुवारीला स. १० वा. आमदुरा, स. ११ वा. माळकौठा, ९ फेब्रुवारीला दु. ४ वा. भोसी, सायं. ५ वा.  रिठ्ठा, १० फेब्रुवारीला दु. ४ वा. पार्डी मक्ता, सायं. ५ वा. लहान, ११ फेब्रुवारीला  दु. ४ वा. बटाळा, सायं. ५ वा. मोघाळी, १२ फेब्रुवारीला दु. ४ वा. पाळज, सायं. ५ वा. पोमनाळा, १३ फेब्रुवारीला दु. ४ वा. कामठा, सायं. ५ वा. मालेगाव, १४ फेब्रुवारीला दु. ४ वा. रोही पिंपळगाव, सायं. ५ वा. निवघा, १५ फेब्रुवारीला स. १० वा. मुदखेड शहर, दु. ४ वा.  भोकर शहर तर १६ फेब्रुवारीला सायं. ५ वा. अर्धापूर शहरात हे प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहेत. सुशिक्षित बेरोजगारांनी जवळच्या गावात आयोजित मेळावापूर्व प्रशिक्षण व २२ फेब्रुवारीला अर्धापूर येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

टिप्पण्या