नांदेड (प्रतिनिधी)- मागील दोन ते अडीच वर्षापासून नांदेड जिल्हाधिकारी म्हणून
कार्यरत असलेले अभिजीत राऊत यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या
रिक्त जागी नवी मुंबई सिडको येथील सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले
यांना पाठविण्यात आले आहे. राजाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी
बदल्या केल्या आहेत.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत भारतीय प्रशासकीय सेवेतील
अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नांदेडचे जिल्हाधिकारी
अभिजीत राऊत यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथील वस्तू व सेवा कर
विभागाचे सह आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. सध्या त्या ठिकाणी मिलिंद
कुमार साळवे हे कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकसभा,
लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुका यशस्वी करून जिल्ह्यात
सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. अभिजीत राऊत यांच्या जागी नांदेडचे
जिल्हाधिकारी म्हणून नवी मुंबई सिडको येथील सह व्यवस्थापकीय संचालक
राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा