परभणी (. ) जागतिक व भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या वतीने वडोदरा गुजरात येथे होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस युवा मालिकेसाठी परभणीच्या आद्या पूजा महेश बाहेती या खेळाडूची निवड झालेली आहे. स्पर्धा दि. 26 फेब्रुवारी ते 01 मार्च या कालावधीत गुजरात मधील वडोदरा येथे समा क्रीडा संकुल येथे आयोजित होणार आहे.
आद्या बाहेती ही महाराष्ट्रातील अव्वल मानांकीत खेळाडू असून भारतामध्ये सर्वप्रथम दहा खेळाडूंमध्ये तिचा समावेश आहे यावर्षी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटने मार्फत होणाऱ्या नामांकन टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत सहा स्पर्धांमध्ये अद्याने एकूण चार सुवर्णपदके व एक कांस्यपदक पटकावत राज्य अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच भारतीय महासंघा मार्फत घेण्यात आलेल्या सहा स्पर्धांमध्ये तिने एक अंतिम फेरी खेळत रौप्य पदक पटकावले आहे राहिलेल्या स्पर्धा बाकी चार स्पर्धांमध्ये तिने उप-उपांत्य पूर्व फेरी खेळत भारतातील अव्वल 10 खेळाडूंमध्ये येण्याचा बहुमान मिळवला असून त्याचेच फलित म्हणून तिची वडोदरा येथे होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस युवक मालिकेसाठी निवड झाली आहे.
आद्या बाहेती ला गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने प्रशिक्षण चेतन मुक्तावार यांचे लाभले.
या निवडीबद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता,महाराष्ट्र राज्य टे.टे संघटना अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, संजय कडू, ॲड अशीतोष पोतनीस, आशिष बोडस,सर्व पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले, क्रीडा अधिकारी ननाकसिंह बस्सी, सुयश नाटकर, रोहन औढेंकर परभणी जिल्हा अध्यक्ष समशेर वरपुडकर , सचिव गणेश माळवे, डॉ.माधव शेजुळ , संतोष सावंत, परभणी क्लबचे सचिव डॉ.विवेक नावंदर,यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

addComments
टिप्पणी पोस्ट करा