नांदेड :(दि.२४ फेब्रुवारी २०२५)
आधुनिक काळ हा माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचा काळ आहे. विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला कुणीही नाकारू शकत नाही. त्याकरिता तरुणांनी नवोपक्रमाची संकल्पना केंद्रस्थानी ठेवून अध्ययन व संशोधनाला प्राधान्य दिले पाहिजे. नवोपक्रम ही आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मा.श्री.नरेंद्र चव्हाण यांनी केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम: उषा) अंतर्गत एक दिवसीय राष्ट्रीय स्पर्धा इनोव्हेशन व इंक्युबेशन केंद्राच्या वतीने दि.२० फेब्रुवारी रोजी आयोजित स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
स्पर्धेचे शीर्षक ' नवीन उपक्रम संकल्पनेवरील विद्यार्थ्यांची राष्ट्रस्तरीय स्पर्धा' हे होते.
याप्रसंगी माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. एस.जी.गट्टाणी, डॉ.बी.एस.जाधव, डॉ.बी. बी.पवार, डॉ.जी.के.पकले, डॉ.पी.जी. कोलपवार, डॉ.पी.यू.लांडे यांनी परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली.
विविध राज्यातील १५१ शीर्षकाअंतर्गत १९३ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीला. विशेष म्हणजे आयआयटी रोपर, पंजाब येथील दोन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये ५० हून अधिक मॉडेल व १०१ पोस्टर होते. प्रथम पारितोषिक रु. ११०००, दुसरे ७००० आणि तिसरे ५००० रु.सहित सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. तसेच ८ उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे मूल्यांकन सॉफ्टवेअर मोडवर करण्यात आल. या सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.मोहम्मद सोहेल यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धा उत्कृष्ट पद्धतीने संपन्न होण्यासाठी समिती अध्यक्ष डॉ.पी.आर. मिरकुटे, समन्वयक डॉ.पी.आर.चिकटे, नियोजन समितीचे सदस्य डॉ.एम.एम.व्हि. बेग, डॉ.एन.ए.पांडे, डॉ. बी.बालाजीराव, डॉ. एस.एम.बिंदगे, डॉ.वाय.टी.नकाते, डॉ.एम. डी.अंभोरे, डॉ. डी.एस.कवळे, डॉ.एन.एल. इंगळे, प्रा.एस.एस.राठोड, प्रा. एस.बी. राऊत, प्रा. शांतूलाल मावस्कर, प्रा. भारती सुवर्णकार, प्रा.पी.पी.शिसोदीया प्रा.एस. आर.वडजे, प्रा.एन.बी.गव्हाने, प्रा.ए.आर. गुरखूदे, प्रा.एस.एम.देलमाडे यांनी परिश्रम घेतले तसेच प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, लेखा विभागातील अभय थेटे, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा