नादेड : (दि.८ फेब्रुवारी २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे "डिजिटल ऐज : एक्सप्लोरिंग आयटी अडवांसमेंट" या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन इंग्लिश लँग्वेज कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्र -कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी भूषविले.
प्रमुख अतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व संस्थेचे कार्यकारीणी सदस्य मा.श्री.नरेंद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान कंपनी सेट ट्राईबचे संचालक श्री.सारंग वाकोडीकर होते. विचारमंचावर संगणकशास्त्र विभागप्रमुख व आयोजक सचिव डॉ.श्रीकांत जी.जाधव, समन्वयक प्रा.डॉ.प्रवीण तामसेकर त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ स्वागत गीताने झाला.
श्री.नरेंद्र चव्हाण यांनी, माहिती तंत्रज्ञानामधील विविध रोजगार व आवश्यक असलेल्या प्रशिक्षणावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, संगणक क्षेत्रातील भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारीत विविध विषयांची माहिती व रोजगारातील सुवर्णसंधी यावर मत व्यक्त केले.
प्रा. गुरुप्रसाद चौसटे यांनी, सेट ट्राईब कंपनीचे संचालक श्री.सारंग वाकोडीकर यांची व कंपनीची ओळख करून दिली.
राष्ट्रीय कार्यशाळेत सेट ट्राइबद्वारे दोन सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रथम सत्रात पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना श्री.सारंग वाकोडिकर यांनी, आय.टी.क्षेत्राची माहिती व नोकरी यावर स्लाईड सादरीकरण केले.
दुसऱ्या सत्रामध्ये पदवीच्या तृतीय वर्ष व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आय.टी. कंपनीमधील नोकरी मिळविण्यासाठी मौखिक परीक्षेची तयारी तसेच व्यक्तिमत्व विकास यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विविध कोर्सेसची माहिती व आवश्यकता श्री.उपलेंचवार व श्री.शहबाज यांनी दिली.
प्रश्नोत्तर सत्रामध्ये वैष्णवी टरके, शुभांगी मिटकरी, दुर्गेश चव्हाण, मोहित देशमुख, निशिगंधा राऊत, वैशाली पवार, सुमित ठाकरे, कृष्णा, सय्यद मुदसिर यांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन कु.अनुष्का जयस्वाल यांनी केले व आभार कु.सानिया तेहरीन यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.पी.बी.पाठक, प्रा.एन.ए.नाईक, प्रा.सौ. शिंदे एस. एम., प्रा.गुरुप्रसाद बी.चौसटे, प्रा. अमरीन खान, प्रा. नीलम अग्रवाल, प्रा. सचिन वडजे, प्रा.चैतन्य देशमुख, प्रा.अफरोज आलम सिद्दिकी यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल. व्ही. पद्माराणी राव, संशोधन कक्षाचे प्रमुख डॉ.एम.एम. व्ही.बेग, इनक्युबेशन आणि इनोव्हेशन कक्षाचे प्रमुख डॉ.पी.आर मिरकुटे, प्रबंधक संदीप पाटील, लेखापाल अभय थेटे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील,जगनाथ महामुने, विठ्ठल सुरणार, माणिक कल्याणकर, प्रशांत मुंगल, अनुराधा मती, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा