स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि शुभम करोती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पावडेवाडी येथे 5 फेब्रुवारी 2025 ते 11 फेब्रुवारी 2025 या दरम्यान करण्यात आले आहे.
या शिबिराचे औपचारिक उद्घाटन 5 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटक म्हणून श्रीमती रूपाली रंगारी कोल्हे मॅडम ( जिल्हा महिला व बालविकास विभाग अधिकारी, नांदेड) यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. चंद्रकांत बाविस्कर, (अधिष्ठाता, आंतरविद्याशाखा, स्वा.रा. ती.म.विद्यापीठ,नांदेड.) हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माझे पावडेवाडी येथील सरपंच कु.सांची लक्ष्मणराव गर्जे या उपस्थित होत्या व प्रमुख विशेष उपस्थिती म्हणून व्यवस्थापन समिती सदस्य,स्वा.रा. ती.म.विद्यापीठ,नांदेड डॉ.हनुमंत कंधारकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वा.रा.ती.म. विद्यापीठ येथील सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ.घनश्याम येळणे यांनी केले. ग्रामीण अभ्यास शिबिराचे समाजकार्य अभ्यासक्रमातील महत्त्व त्यांनी स्पष्ट केले व शहरीकरणाचा ग्रामीण समाज व्यवस्थेवर होणारा परिणाम अभ्यासणे हे निवासी ग्रामीण शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
या शिबिरातील सात दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा शुभंकरोती फाउंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी मांडले. या शिबिरादरम्यान विविध विषयांवर विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक सत्रांचे आयोजन बालविवाह निर्मूलन, गाव शिवारफेरी, श्रमदान, आरोग्य तपासणी शिबिर, शेतकरी मेळावा, महिला मेळावा,युवक मेळावा, गाव सर्वेक्षण तसेच समाज प्रबोधनपर किर्तन व पथनाट्य यांचे आयोजन केले जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन स्थाने असलेल्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रूपाली रंगारी कोल्हे मॅडमनी आपल्या मनोगतात बालविवाह निर्मूलनासाठी शासनाच्या विविध उपक्रमबद्दल माहिती सांगितली तसेच 'बेटी बचाओ ,बेटी पढाओ' यासाठी सामूहिक शपथ घेतली तसेच बालविवाह मुक्तीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली.
मौजे पावडेवाडी येथील सरपंच सांची लक्ष्मणराव गर्जे यांनी महिला सक्षमीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीतील विविध योजनांची माहिती सांगितली.
ग्रामीण भागातील सामाजिक आर्थिक समस्या शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेण्यासाठी ग्रामीण अभ्यास शिबीर अत्यंत महत्त्वाचे आहे असे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.हनुमंत कंधारकर यांनी प्रतिपादन केले.
यावेळी अध्यक्षीय समारोपात डॉ. चंद्रकांत बाविस्कर, (अधिष्ठाता, आंतरविद्याशाखा, स्वा.रा. ती.म.विद्यापीठ,नांदेड.) यांनी ग्रामीण अभ्यास शिबिरातील विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासातील महत्व विशद केले. तसेच प्रतिक्षा किर्तने हिने बालहक्क प्रबोधनपर गीताचे सादरीकरण केले.
या सात दिवशी निवासी ग्रामीण अभ्यास शिबिरासाठी मुख्य समन्वयक म्हणून प्रा.डॉक्टर स्मिता नायर व प्रा.ओंकार मठपती राहत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम सातपुते व आभार प्रदर्शन व्यंकटेश इंगोले या समाजकार्याच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा