३८व्या राष्ट्रीय खेल स्पर्धेकरीता महाराष्ट्राचा टेबल टेनिस संघ जाहीर*.

*सिध्देश पांडे, दिया चितळे यांच्या कडे महाराष्ट्र संघाची धुरा*.

मुंबई:- उत्तराखंड येथे सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय खेल स्पर्धेत दिनांक ९ ते १३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या टेबल टेनिस स्पर्धेकरीता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. दिया चितळे मुंबई उपनगर कडे महिला, तर सिध्देश पांडे ठाणे जिल्हा कडे पुरुष संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. निवडण्यात आलेले हे दोन्ही संघास  महेंद्र चिपळूणकर, सुनील बाब्रास  यांच्या मार्गदर्शनात ठाणे येथे सराव करीत आहे. निवडण्यात आलेला हा संघ दिनांक ७ फेब्रु. रोजी दुपारी ०२-५० च्या विमानाने स्पर्धेकरीता उत्तराखंडला दाखल  अशी माहिती राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतिन टिपण्णीस यांनी एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना दिली. निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.



तारीख:  9 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान महाराष्ट्र राज्य संघाचे नेतृत्व करणार आहेत.

पुरुष संघ

1 दीपित पाटील ( ठाणे)

2 चिन्मय सोमय्या (मुंबई उपनगर)

3 जश मोदी  (मुंबई उपनगर)

4 सिद्धेश पांडे  (ठाणे )

5 रेगन अल्बुकर्क ( मुंबई उपनगर)

महिला संघ:-

1 स्वस्तिक घोष (रायगड )

2 दिया चितळे  (मुंबई उपनगर)

3 तनीशा कोटेचा (नाशिक )

4 रीथीशय टेनिसशन (मुंबई उपनगर)

5 सायली वाणी (नाशिक) 


1 महेंद्र चिपळूणकर: (मुंबई) प्रशिक्षक पुरुष संघ

2 सुनील बाब्रास:( पुणे ) महिला संघाचे प्रशिक्षक

3श्री राम कोनकर:(पुणे) पुरुष संघ व्यवस्थापक  

4 गणेश माळवे: (परभणी ) महिला संघ व्यवस्थापक

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघास शुभेच्छा राज्य अध्यक्ष प्रविण लुंकड, ॲड अशीतोष पोतनीस, संजय कडू, महाराष्ट्र ऑलिम्पिक सरचिटणीस नामदेव शिरगावकर, डॉ सुनील पूर्णपाञे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या