अशोक कुरुडे यांना जनहित साहित्यरत्न पुरस्कार

 

 नांदेड (प्रतिनिधी)- दि. 27 जानेवारी रोजी सोनखेड ता.लोहा जि. नांदेड येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि राजश्री शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा (दे) ता.लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
    सदरील संमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ हे होते. या संमेलनात अशोक कुरुडे यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जनहित साहित्यरत्न पुरस्कार प्रदान कडून सन्मानित करण्यात आले.
 अशोक कुरुडे यांची बालसाहित्य व प्रौढसाहित्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, तसेच त्यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
टिप्पण्या