सौ.गंगुबाई सुर्यकांत इंद्राळे,के.एस.जायभाये गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित

नांदेड/प्रतिनिधी-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिनी शाळेच्या शिक्षिका सौ.गंगुबाई सुर्यकांत इंद्राळे व के.एस.जायभाये यांना नाळेश्वर येथील शालेय व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत कार्यालयाच्यावतीने देण्यात येणार्‍या ग्राम गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दि.26 जानेवारी (प्रजासत्ताकदिन) चे औचित्य साधून नाळेश्वर येथील शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्राम पंचायत कार्यालयाच्यावतीने देण्यात येणारा ग्राम गुरु गौरव पुरस्कार सोहळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात मान्यंवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षिका सौ.गंगुताई सुर्यकांत इंद्राळे यांना 2024 च्या ग्राम गुरु गौरव पुरस्कार तर के.एस.जायभाये यांना 2025 च्या ग्राम गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला जि.प.चे माजी सभापती नरहरी वाघ, सरपंच सौ.उषाताई वाघ,  शिक्षण परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजयजी कोठोळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.आशाताई वाघोळे,  प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, पदोन्नत मुख्याध्यापक पंडितराव कदम, ग्रामविकास अधिकारी सौ.काटकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव वाघ, रंगनाथराव वाघ, राहुल वाघ, गजानन वाघ, बळीराम वाघ, युवराज वाघोळे, गंगाधर इंगोले, गजानन वाघ, रामदास गोरे, कदम, प्रा.गादगे आदी मान्यंवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पंडितराव कदम, संजय कोठाळे, गुणवंत मांजरमकर, यादवराव एकाळे, सौ.शांताबाई मांजरमकर, सौ.केंद्रे एन. पी. यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या