पीपल्स अमृत महोत्सव स्नेहसंमेलन बक्षिस वितरण व समारोप समारंभ संपन्न
नांदेड दि. ०१
केवळ ज्ञानच नव्हे तर विद्यार्थ्यांनी एखादी कला व क्रीडा प्रकार जोपासला पाहिजे. जीवनामध्ये अनेक ताणतणाव असून यातून मुक्त होण्याचे साधन म्हणजे कला व क्रीडा आहे आणि याची जडणघडण ही कॉलेजमधूनच व्हायला पाहिजे. असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पीपल्स कॉलेज, नांदेडच्यावतीने आयोजित पीपल्स अमृत महोत्सव स्नेहसंमेलन-२०२५ च्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना केले.
दि. ३० व ३१ रोजी आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दि. ३१ रोजी विविध कला गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये एकपात्री अभिनय, फॅन्सी ड्रेस, गीतगायन, पोस्टर मेकींग, रांगोळी स्पर्धा, नृत्य इत्यादींमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्द सहभाग नोंदविला.
समारोप व बक्षिस वितरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत पुढे बोलतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव देणारी विशेषतः सांस्कृतिक व वैचारिक अधिष्ठान असलेली संस्था म्हणजे नांदेड एज्युकेशन सोसायटी असून आपण या संस्थेचे विद्यार्थी आहात. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विद्यापीठातून एम.ए. मराठी मध्ये सर्व द्वितीय येणारी कु. कदम समीक्षा गंगाधर, एम.ए. हिंदी मध्ये सर्व तृतीय श्री. शेख सलिम रफिक व आंतरविद्यापीठ व अश्वमेध स्पर्धेमध्ये खो-खो क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणारा आकाश चंचलवाड यांचा सत्कार मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव यांनी केले. याप्रसंगी दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द ग्रामीण कथाकार श्री. राम तरटे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज अनेक लोक स्टेटस ठेवतात, परंतु विद्यार्थ्यांनी ज्ञान घेऊन आपले असे स्टेटस निर्माण केले पाहिजे की त्यांचे स्टेटस अनेकांनी ठेवले पाहिजे. पुढे त्यांनी आपल्या ग्रामीण कथा 'बाराण्याची बोंब' सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
अध्यक्षीय समारोपामध्ये संस्थेच्या सचिव प्रा. श्यामल पत्की म्हणाल्या की, एखादं ध्येय समोर असले की, माणूस खूप मेहनत व प्रयत्न करतो आणि आपल्या उध्दिष्टापर्यंत पाहोचतो. त्यामुळे प्रयत्नांचच दुसरं नाव यश असते आणि आपण सतत प्रयत्न व मेहनत केलीच पाहिजे. यावेळी मंचावर शालेय समितीचे अध्यक्ष अॅड. प्रदिप नागापूरकर, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी अॅड. सी.बी. दागडीया, नौनिहालसिंग जहागिरदार, दीपनाथ पत्की, कु. शांभवी साले, डॉ. यशपाल भिंगे, प्रा.विलास वडजे, उपप्राचार्य डॉ. अशोक सिध्देवाड, प्रा.ए.आर. इनामदार, डॉ. बाजीराव वडवळे हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. विजय कदम यांनी केले तर आभार डॉ. विशाल पतंगे यांनी मानले. पीपल्स अमृत महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सी. के. हरनावळे, डॉ.अनंत राऊत, डॉ. सचिन पवार, डॉ. मनिषा गहिलोत, डॉ. मथु सावंत, डॉ. बालाजी पोतुलवार, डॉ. विठ्ठल दहिफळे, डॉ. ज्ञानेश्वर डीगोळे, डॉ. रेश्मा डोईफोडे, डॉ. मुकुंद कवडे, प्रा. आनंद थोरात, ग्रंथपाल प्रा. संदीप गायकवाड, डॉ. विजू जाधव, डॉ. पूनम लोहाना, डॉ. आम्रपाली कसबे, श्री.रोहिदास आडे, राहुल गवारे, रवि शेन्डेराव, गोविंद कुंटे, किरण कुलकर्णी आदिंनी परिश्रम घेतले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा