प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे वाङ्मय पुरस्कार जाहीर


विजय कुवळेकर, देवा झिंजाड, अशोक कोठावळे, अनंत कडेठाणकर, छाया बेले, श्रीकांत पाटील हे पुरस्कारांचे मानकरी

नांदेड दि. 14 -

येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या 2023-24 ह्या वर्षीच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून विजय कुवळेकर, देवा झिंजाड, अशोक कोठावळे, डॉ. अनंत कडेठाणकर, छाया बेले आणि डॉ. श्रीकांत पाटील यांचा ह्या पुरस्कारांच्या मानकर्‍यांमध्ये समावेश आहे.

 (1) एका ज्येष्ठ लेखकाला दरवर्षी मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाच्या साधना सन्मानासाठी पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्री विजय कुवळेकर यांची निवड करण्यात आली आहे. रु. 11,000 रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या  पुरस्काराचे स्वरूप आहे.

(2) सर्वोत्कृष्ट पुस्तकाकरिता देण्यात येणार्‍या प्रसाद बन वाङ्मय पुरस्कारासाठी पुणे येथील लेखक व कवी देवा झिंजाड यांच्या ’एक भाकर तीन चुली’ (प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस) ह्या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. रु.11,000 रोख, सन्मानपत्र  आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

(3) प्रसाद बन ग्रंथगौरव (राज्यस्तरीय) पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील लेखक डॉ. अनंत कडेठाणकर यांच्या ’लाईफ जॅकेट’ (प्रकाशक : गोदा प्रकाशन) ह्या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रु. 5000 रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

(4) दुसरा ग्रंथगौरव पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील साहित्यिकाला देण्यात येतो. छाया बेले यांच्या ’हॅप्पी होमच्या भिंतीआड’ (प्रकाशक : साहित्याक्षर प्रकाशन) ह्या कवितासंग्रहाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.  रु. 5000 रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

(5) प्रसाद बन राज्यस्तरीय  बालसाहित्य पुरस्कारासाठी  कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ’बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा’ (प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन) ह्या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. रु. 5000 रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

(6) राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कारासाठी मुंबई येथील ’दीपावली’ ह्या दिवाळी अंकाची निवड करण्यात आली आहे. अशोकराव कोठावळे हे ह्या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत. रु. 5000 रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि वाङ्मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांनी नांदेड येथे ह्या पुरस्कारांची घोषणा केली. प्रतिष्ठानच्या वाङ्मय पुरस्कारांचे हे 24वे वर्ष आहे. शनिवार, दि. 22 मार्च रोजी नांदेड येथे एका विशेष समारंभात ह्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

डॉ. सुरेश सावंत डॉ. अच्युत प्रसाद बन

निमंत्रक, अध्यक्ष,

वाङ्मय पुरस्कार समिती प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान

टिप्पण्या