*'यशवंत ' मध्ये ‘केंद्रीय अर्थसंकल्प: २०२५-२६' चे चिकित्सक विश्लेषण संपन्न*


नांदेड:( दि.१४ फेब्रुवारी २०२५) 

                यशवंत महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग आणि संशोधन केंद्राच्या वतीने दि.१२ फेब्रुवारी रोजी 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ चे चिकित्सक विश्लेषण’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

                  या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

                 यावेळी प्रमुख वक्ते सनदी लेखापाल श्री. राहुल जिलेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

          माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.पी.आर. मुठ्ठे यांच्या नियोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

                 कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे यांच्या हस्ते प्रमुख वक्ते सनदी लेखापाल श्री.राहुल जिलेवार यांचे स्वागत करण्यात आले.

          प्रारंभी प्रास्ताविकात डॉ.डी.ए. पुपलवाड यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश, अर्थशास्त्राचे विद्यार्थी या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पाचे महत्त्व, संकल्पनात्मक व सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच अर्थसंकल्पाबद्दल विद्यार्थ्यांना असणारे वास्तविक ज्ञान व त्याचा समाजहितासाठी उपयोग यावर भाष्य केले. 

        सनदी लेखापाल श्री.राहुल जिलेवार यांनी, अर्थसंकल्प २०२५-२६ चे चिकित्सक विश्लेषण यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या अर्थसंकल्पात कृषी, एमएसएमई, गुंतवणूक, निर्यात प्रोत्साहन, वस्तू व सेवा कर संरचना, कर सुधारणा प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर, मुद्रा लोन, सूक्ष्म वित्त, प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, दारिद्र्य, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, लोकल फॉर होकल, नारीशक्ती, अंगणवाडी पोषण आहार, पर्यावरण संवर्धन या महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात कोणते धोरणात्मक बदल व तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, याबाबत मागील अर्थसंकल्पातील काही संदर्भ देऊन तुलनात्मक चिकित्सक विश्लेषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

          अध्यक्षीय समारोपात डॉ.कविता सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, हा अर्थसंकल्प सर्व समावेशी विकास साध्य करणारा अर्थसंकल्पआहे. या अर्थसंकल्पात एका राज्याला दिलेल्या विशेष सोयी सवलतीचा संदर्भ देऊन त्या म्हणाल्या, अर्थकारणावर राजकारणाचा सुद्धा विशेषत्वाने प्रभाव दिसून येतो. यावरून राज्यशास्त्राचे महत्व अधोरेखित होते. 

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.डी. डी. भोसले यांनी केले. याप्रसंगी डॉ.वीरभद्र स्वामी, अर्थशास्त्र विभागातील सहकारी प्रा. डॉ.एस.डी. आवाळे, प्रा.राहुल लिंगमपल्ले, प्रा. नयना देशमुख, डॉ. योगिता पवार उपस्थित होते तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   शेवटी आभार डॉ.संतोष पाटील यांनी मानले.

                  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ. एल. व्ही. पदमारानी राव, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या