नांदेड:( दि.२३ फेब्रुवारी २०२५) निळा रोड, तुलसी पेंट्सच्या अलीकडे स्थित भगवान रजनीश ब्लेसिंग्ज मेडिटेशन इंटरनॅशनल कम्युन येथे दि. २३ फेब्रुवारी २०२५, रविवार रोजी एक दिवसीय ध्यान शिबिर उत्साहात संपन्न झाले.
या ध्यान शिबिरात सुवर्णप्रकाश ध्यान, सायलेंट सीटिंग, लिसनिंग मेडिटेशन, नृत्य ध्यान, गीत संगीत ध्यान आणि भगवान रजनीश प्रवचनाचा साधकांनी लाभ घेतला.
भगवान रजनीश यांच्या हस्ते संन्यासीत स्वामी गोपाळ भारती यांचे मार्गदर्शन आणि स्वामी प्रेम प्रशांत व मा प्रेम सुगंधा यांच्या नियोजनानुसार प्रा. महेंद्र देशमुख, उमरी, यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, सरिता पनाड आदींनी या शिबिरात भाग घेतला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी हदगाव येथील गटविकास अधिकारी कैलास बळवंत, मुख्याध्यापक साहेबराव चव्हाण आणि उमरखेड येथील सुभाष रणवीर यांनी सहकार्य केले. दर रविवारी कम्युनमध्ये एक दिवसीय ध्यान शिबीर सकाळी सात पासून संध्याकाळपर्यंत नियमित संपन्न होत आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा