प्रकाश कारत यांच्या व्याख्यानाचे सेलूत आयोजन कै.श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित कै.श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाले अंतर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय समन्वयक प्रकाश कारत यांच्या व्याख्यानाचे शुक्रवारी, २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजन करण्यात आले आहे.  "भारतीय संविधानाची ७५ वर्षे - नवीन आव्हाने" हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.  व्याख्यानामालचे हे ४९ वे पुष्प आहे.

नूतन विद्यालय परिसरात आयोजित व्याख्यानास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, व्याख्यानमाला संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, सहसंयोजक प्रा.सुभाष बिरादार यांनी केले आहे.

टिप्पण्या