*गंगाखेड (प्रतिनिधी )* महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटना परभणीच्या जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण) पुरुषांमध्ये गोपाळ मंत्री तर महिलांमध्ये ममता पैठणकर यांच्या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिनेश कुलकर्णी साहेब यांनी दिले. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या नियोजन व आढावा बैठकीमध्ये हे नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिनेश कुलकर्णी साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष लक्ष्मण पवार साहेब, रमेश जोगदंड साहेव यांची उपस्थिती होती. पोलीस बंधू आणि भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे व त्यांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक उपक्रम राबवणे, पोलीस व सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये सलोख्याचे व सहकार्याचे संबंध निर्माण करणे, गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करणे,एक आदर्श नागरिक निर्माण करणे, पोलिसांना सहकार्य करण्यासाठी विविध जिल्हा पातळीवर पोलीस मित्र मंडळ स्थापन करणे असे या पोलीस मित्र संघटनेचे उद्देश आहेत तरी या उद्देशांना समोर ठेवून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे असे मनोगत दिनेश कुलकर्णी साहेब यांनी व्यक्त केले . कार्यक्रमासाठी बजरंग दलाचे अध्यक्ष संजय लाला आनावडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनवर लिंबेकर, ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष सोपान टोले, सय्यद ताजुद्दीन, अथर्व रोडे, प्रा.अभिलाषा मंत्री,समाजसेविका प्रतिमा वाघमारे, अर्चना जोशी, प्रा. सुरेखा शेंदकर, आशा रेघाटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ मंत्री सर सूत्रसंचलन अभिलाषा मंत्री यांनी केले .
*पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गोपाळ मंत्री* ,*ममता पैठणकर*
• Global Marathwada


addComments
टिप्पणी पोस्ट करा