*गंगाखेड आगारात प्रवासी दिन उत्साहात साजरा*



 *गंगाखेड (प्रतिनिधी)* 

 गंगाखेड तालुका प्रवासी महासंघ व राज्य परिवहन महामंडळ गंगाखेड आगार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 फेब्रुवारी  रोजी रथसप्तमीनिमित्त गंगाखेड बस स्थानक येथे प्रवासी दिन साजरा करण्यात आला. प्रवासी महासंघातर्फे उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, अचानक झालेल्या या स्वागतामुळे बरेच प्रवासी आनंदित झाले. याप्रसंगी प्रवासी महासंघाचे कार्य याविषयी उपस्थित प्रवाशांना माहिती देण्यात आली.तसेच उत्कृष्ट सेवा बजावणारे चालक व वाहक यांचा देखील  सत्कार करण्यात आला. यावेळी गंगाखेड तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष गोपाळ मंत्री, संघटक सूर्यमाला मोतीपवळे,प्रवासी महासंघाच्या सदस्य प्रा. अभिलाषा मंत्री, समाजसेविका प्रतिमा वाघमारे, सुनीता घाडगे, गुलनाज भाभी, आशा रेघाटे, लक्ष्मी आडे, अलका तमखाने, रा. प.चे वाहतूक निरीक्षक दीपक मुंडे, श्याम डोळे, गंगाधर मुंडे, वैजनाथ बडे, वरिष्ठ लिपिक शेखर शिंदे, वामनराव सोनवणे, एल.पी. ढवळे,  आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या