एका शाळकरी विद्यार्थ्यांनी सोबतच शिक्षकांनीच केला गैर कृत्य पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल..

 

देगलूर:- तालुक्यातील मरखले येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शाळकरी अल्पवयीन विद्यार्थिनीवरच शिक्षकाने वाईट हेतु ठेवून पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर आय लव यू असे वगैरे वगैरे मेसेज करून लैंगिक छळ केल्याप्रकरणी मरखेल पोलीस स्टेशनमध्ये शिक्षक पेशीला काळीमा पोसण्यार्या शिक्षकाविरुद्ध शनिवारी दि.२५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरखेल जिल्हा परिषद हायस्कूलमधील नराधाम शिक्षक सदानंद विद्यासागर भुताळे रा.देगलूर यांनी शाळेतील 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा मागील एक महिन्याभरापासून पाठलाग करुन तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तगादा लावत होता. तसेच मुलीच्या आईच्या मोबाईलवर वाईट व घाण शब्दात मेसेज केल्याचा आरोप पण होतं आहे.
  या सदरील प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून मरखेल पोलीस ठाण्यात गु.र. नं. 22/2025 भारतीय न्याय संहितेच्या कलम 75 (1), (2) 78, कलम 11, 12 पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नरधाम शिक्षकास अटक करण्यात आली असून घटनेचा तपास ये पिया रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक संजय वळसे हे पुढील तपास करीत आहेत.

चोकट 
-----------
मरखेल जिल्हा परिषद हायस्कूल मधील नराधम शिक्षकास पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून ठोकले बेड्या..
टिप्पण्या