*राज्यस्तरीय शालेय सेपक टकारा क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन*

नांदेड- मा. आयुक्त, कीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व जिल्हा क्रीडा परिषद‌...


नांदेड- मा. आयुक्त, कीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व जिल्हा क्रीडा परिषद‌ नांदेड संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन व नांदेड जिल्हा सेपक टकारा असोसिएशन यांचे सहकार्याने राज्यस्तरीय शालेय सेपक टकारा (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन दि. 03 ते 05 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे करण्यात आले असुन या स्पर्धेचा उदघाटन समारंभ जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड) यांचे अध्यक्षतेखाली , प्रवीण कुपटीकर (उपाध्यक्ष, महाराष्ट्र सेपकटाकरों असो.), यांचे शुभहस्ते दि.04 डिसेंबर, 2024 रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी डॉ. विनय मुन (सदस्य, महाराष्ट्र सेपकटाकरों असो), गणेश माळवे (राज्य सदस्य व निवड समिती सदस्य), राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी), विपुल दापके (क्रीडा अधिकारी),रवीकुमार बकवाड (निवड समिती सदस्य), दर्शन हस्ती (निवड समिती सदस्य), डॉ. रंगनाथ सुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी जयकुमार टेंभरे यांनी म्हणाले की, शालेय क्रीडा स्पर्धेतून खेळाडूंचा शारीरिक, बौध्दीक व संघटनात्मक विकास होतो. शालेय जिवनातून विद्यार्थ्यांनी एक तरी खेळ खेळावा व आपले करीअर घडवावे. तसेच गणेश माळवे (निवड समिती सदस्य) यांनी म्हणाले की, नाविन्यपूर्ण खेळण्यात येणारा सेपकटाकरों हा खेळ

आज संपूर्ण जगात प्रसिध्द झालेला असून या खेळातून शारीरिक लवचिकता दिसून येते. शालेय क्रीडा स्पर्धेसोबत फेडरेशनच्या स्पर्धेत सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खेळाव्यात व यातून आपले करिअर घडवावेत असे आवाहन केले.


नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे यावर्षीतील ही 7 वी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबददल महाराष्ट्र सेपकटाकरों असोसिएशनच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांचा सत्कार करण्यात आला.


या स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्यातील 08 विभागातून खेळाडू मुले मुली, निवडसमिती सदस्य, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित झालेले आहेत. मुले व मुली खेळाडू, संघव्यवस्थापक व पंच यांची निवास व भोजन व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे.


या स्पर्धेकरीता पंच म्हणुन  मोहमद कमरान अन्सारी (नागपूर), इर्शाद सागर (नागपूर), रामदेव बालपांडे (वर्धा), दर्शन हस्ती (वर्धा), लखांशु लडके (वर्धा),  अनिकेत काळे (वर्धा), सौरभ कौसुलकर (वर्धा)ओम मुळे (वर्धा), सागर कवळे (मुंबई), वैभव शिंदे (मुंबई), विनीत ओव्हाळ (मुंबई), व्यापारे (मुंबई) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.


सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा. जयकुमर टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी तथा कार्यासन), क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक  बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक), श्रीमती शिवकांता देशमुख, वरिष्ठ लिपीक  संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक  दत्तकुमार धुतडे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व सेपक टकारा असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदि सहकार्य करीत आहेत.

या कार्यक्रमाचे सुत्र संचलन राहुल श्रीरामवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी बकवाड यांनी केले. सदर स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड येथे आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडाप्रेमी, रसीक यांनी आनंद घ्यावा,

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel